CORONAVIRUS : कोविड-१९ चा इनकन्क्ल्युझिव्ह अहवाल म्हणजे काय? जाणून घ्या..

dr namdeo suryvanshi.jpg
dr namdeo suryvanshi.jpg

लातूर : कोरोना कोविड-१९ या विषाणूची लागण झाली आहे की नाही हे तपासण्यासाठी रुग्णांचा स्वॅब नमुना प्रयोग शाळेत तपासला जातो. हे नमुने तपासताना कोरोनाच्या संदर्भाने दोन जीनची तपासणी केली जाते. त्यात एक जीन आढळून आला नाही तर त्या संबंधीच्या अहवालाला इनकन्क्ल्युझिव्ह (Inconclusive) म्हटले जाते. अशी माहिती विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे सुक्ष्मजीवशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. नामदेव सूर्यवंशी यांनी दिली.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
गेल्या काही दिवसापासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यात दररोज काही रुग्णाचे अहवाल इनकन्क्ल्युझिव्ह येत आहेत. त्यामुळे इनकन्क्ल्युझिव्ह म्हणजे काय याच्या शंकाही सातत्याने उपस्थितीत होत आहेत. या संदर्भात डॉ. सूर्यवंशी यांनी माहिती दिली.

कोरोना विषाणुची फॅमिली चार जीन्समध्ये (genus) मध्ये विभागली जाते. यात अल्फा, बेटा, गामा आणि डेल्टा असे चार विभाग पडतात. त्यापैकी बेटा कोरोना व्हायरस (Beta-CoVs) याचे मानवी संसर्गामध्ये विशेष महत्व आहे. या व्हायरसच्या ए, बी आणि सी अशा वंशावळी आहेत. त्यापैकी ए वंशावळी मध्ये OC४३ आणि HKU१ प्रजाती येतात. OC४३ संसर्गामुळे साधी सर्दी होते आणि HKU१ संसर्गामुळे सर्दी, न्यूमोनिया होतो. बी वंशावळीमध्ये SARS-CoV आणि SARS-CoV-२ या प्रजाती येतात. SARS-CoV मुळे SARI (severe acute respiratory illness) आजार होतो. आणि SARS-CoV-२ या प्रजातीमुळे कोविड-१९ आजार होतो. सी वंशावळीमध्ये MERS ही प्रजाती येते, अशी माहिती डॉ. सूर्यवंशी यांनी दिली.

कोविड-१९ आजाराचे निदान करताना स्क्रीनिंग आणि कन्फर्मेटरी टेस्ट केली जाते. स्क्रीनिंग टेस्ट मध्ये  E gene तपासला जातो. हा जीन सर्व Beta-CoV मध्ये असतो. याचाच अर्थ तो OC४३, HKU१, SARS-CoV, SARS-CoV-२ आणि MERS या विषाणू प्रजातींपैकी कुणाचाही असू शकतो. त्यामुळे ज्या सॅम्पल मध्ये E-gene आढळून येतो त्या सॅम्पलची कन्फर्मेटरी टेस्ट केली जाते. त्यासाठी कोविड-१९ या प्रजातीमध्येच सापडणारे RdRP आणि ORF१b genes तपासले जातात.

शेवटी ज्या सॅम्पल मध्ये E-gene आणि RdRP व ORF१b पैकी कुठलाही एक जीन आढळून येतो. त्याला कोविड-१९ आजारासाठी पॉझिटीव्ह  रिपोर्ट केला जातो. ज्या सॅम्पल मध्ये फक्त E-gene आढळतो आणि RdRP/ORF१b आढळून येत नाही त्या सॅम्पल ला  इनकन्क्ल्युझिव्ह (Inconclusive) असे रिपोर्ट केले जाते, अशी माहिती त्यांनी दिली.

इनकन्क्ल्युझिव्ह रिपोर्टमध्ये असतात या तीन शक्यता 

  •  इनकन्क्ल्युझिव्ह रिपोर्ट असलेल्या रुग्णात तीन शक्यता असतात. पहिली शक्यता म्हणजे त्या रुग्णाला कोविड-१९ आजाराची सुरुवात असू शकते. पण संसर्गाच्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये व्हायरल लोड कमी असल्याकारणाने कन्फर्मेटरी जीन्स आढळून येत नाहीत. त्यामुळे दोन ते चार दिवसानंतर जर पुन्हा चाचणी केली तर व्हायरल लोड वाढून तो पॉझिटीव्ह येऊ शकतो.
  •  दुसरी शक्यता त्या रुग्णाला काही दिवसांपूर्वी कोविड-१९ चा संसर्ग झालेला असू शकतो आणि आता व्हायरल लोड कमी होत असल्यामुळे कन्फर्मेटरी जीन्स आढळून येत नाहीत. त्यामुळे दोन चार दिवसानंतर जर पुन्हा चाचणी केली तर व्हायरल लोड आणखीन कमी होऊन तो निगेटीव्ह येऊ शकतो, अशी माहिती डॉ. सूर्यवंशी यांनी दिली.
  • तिसरी शक्यता त्या रुग्णाला कोविड-१९ आजार नसून वर नमूद केलेल्या Beta-CoV च्या वंशावळीतील विषाणूंचा संसर्ग असेल आणि असे रुग्ण परत परत इनकन्क्ल्युझिव्ह येतात, असे डॉ. सूर्यवंशी यांनी दिली. 



संपादन : प्रताप अवचार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com