अंबाजोगाई येथील युवकाने वाचविले बुडणाऱ्या बालकाचे प्राण

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 April 2020

दोन वर्षांचे बालक खेळत असताना विहिरीत पडले. ते लक्षात येताच जवळच असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विहिरीत उतरून बुडालेल्या बालकाचे प्राण वाचविले

अंबाजोगाई (जि. बीड) - येथील धनगर गल्लीतील बालाजी मंदिराजवळ रविवारी (ता. १२) सायंकाळी एक दोन वर्षांचे बालक खेळत असताना विहिरीत पडले. ते लक्षात येताच जवळच असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विहिरीत उतरून बुडालेल्या बालकाचे प्राण वाचविले आणि त्याच्या आईकडे स्वाधीन केले. 

येथील धनगर गल्लीत बालाजी मंदिराजवळ कठडे नसलेली सरस्वती तीर्थ ही जुनी विहीर आहे. त्याच्या दक्षिणेकडे सय्यद हाफीस परिवार राहतात. तर तीर्थाच्या उत्तरेकडे बालाजी मंदिरात जहागीरदार कुटुंब राहते. सय्यद हाफीस यांचा दोन वर्षांचा मुलगा सय्यद जहिर हे बालक एकटेच खेळत खेळत विहिरीजवळ गेले.

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...बघा कोण म्हणतंय... 

ने पायऱ्याही उतरल्या. त्याचा तोल गेल्याने तो पाण्यात पडला. त्याचा आवाज कानी पडताच शेजारी राहणाऱ्या प्रणिता विनय जहागीरदार यांनी आपला मुलगा अथर्व (वय १८) याला त्या बालकास वाचविण्यास सांगितले. तत्काळ त्याने विहिरीत उडी घेऊन बुडणाऱ्या बालकाचा जीव वाचविला. अथर्व हा बारावीत (विज्ञान शाखा) शिकत आहे. 

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...

अथर्व जहागीरदार म्हणाला, मला पोहता येत असल्यामुळे आत्मविश्वास होता. आपण बालकाचे प्राण वाचविल्याचा अभिमान वाटतो. प्रणिता जहागीरदार म्हणाल्या, की आमच्या घराच्या भिंतीजवळ तीर्थ आहे. मला सुरवातीला एक बालक रडत असलेला आवाज आला. थोड्यावेळाने पाण्यात काहीतरी पडल्याचा आवाज आला. त्वरित माझ्या मुलाला अथर्वला पाठवून त्या बालकाचे प्राण वाचविले. हिंदू युवकाने मुस्लिम बालकाचे प्राण वाचवून समाजात एकात्मतेचा संदेश दिला आहे. 

हेही वाचा - युरोपात जर्मनीनेच रोखला मृत्युदर, सर्वाधिक चाचण्या, वेळेत उपचार

हेही वाचा - युरोपातील सर्व देशांनी आता संयुक्त कृती करावी - डॉ. जॉन कार्लोस

हेही वाचा - युकेचे पंतप्रधान  रुग्णालयात, जनता घरात बसून...

हेही वाचा - अमेरिकेतील नोकऱ्या धोक्यात, पण हे क्षेत्र तारणार...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young boy rescues drowning boy's life