
भोपला (ता. केज) येथील सत्तावीस वर्षीय तरुण शेतकरी शेतातील बिघडलेली विद्युत मोटार दुरुस्त करीत असताना अचानक तोल जाऊन पाण्यात पडला. त्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवार (ता. पाच) रोजी घडली.
केज (बीड) : भोपला (ता. केज) येथील सत्तावीस वर्षीय तरुण शेतकरी शेतातील बिघडलेली विद्युत मोटार दुरुस्त करीत असताना अचानक तोल जाऊन पाण्यात पडला. त्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवार (ता. पाच) रोजी घडली.
शेतकऱ्यांच्या मानगुटीवर ‘आरटीओ’चे भूत, ओव्हरलोडिंगच्या नावाखाली लूट
भोपला येथील सत्यजित मारूती जाधव हा तरूण शेतकरी भोपला शिवारातील पळसाचे शेतातील विहिरीवरील नादुरुस्त विद्युत मोटार दुरुस्त करत होता. मोटार दुरुस्त करीत असताना अचानक तोल जाऊन तो पाण्यात पडला. विहिरीत पाणी भरपूर असल्याने आणि त्याला पोहता येत नसल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
बिबट्या सापडेना, शोधमोहीम गुंडाळण्याची तयारी; पंधरा दिवसांच्या मोहिमेत हाती काहीच नाही
या घटनेची माहिती मिळताच पोलीस नाईक अमोल गायकवाड, वैभव राऊत व अशोक गवळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह उच्चस्तरीय तपासणीसाठी चिंचोलीमाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविला. त्यानंतर रात्री मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी मारुती जाधव यांनी दिलेल्या माहितीवरून केज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक अशोक गवळी हे करीत आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
संपादन-गणेश पिटेकर