esakal | मुलीचेच फोटो वापरून बनवला अश्लील व्हिडिओ, पोलिसांनी उचलला आणि... 
sakal

बोलून बातमी शोधा

Beed News

परळी तालुक्यात शेतात जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे फोटो काढून त्याचे अश्लिल व्हिडीओ बनविणाऱ्या एका टिकटॉकवीराला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. 

मुलीचेच फोटो वापरून बनवला अश्लील व्हिडिओ, पोलिसांनी उचलला आणि... 

sakal_logo
By
दिगंबर देशमुख

सिरसाळा (बीड) : परळी तालुक्यात शेतात जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे फोटो काढून त्याचे अश्लिल व्हिडीओ बनविणाऱ्या एका टिकटॉकवीराला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. 

परिसरातील गोवर्धन हिवरा (ता. परळी) येथे शुक्रवारी (ता. एक) हा प्रकार घडला आहे. गावातल्या एका टिकटॉकवीराने शेतात जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे फोटो काढून टिकटॉकवर अश्लील व्हिडिओ बनवला. त्या व्हिडिओला त्याने ‘मैं हूं आशिक आवारा’ आणि ‘केसामध्ये गजरा’ अशी गाणीही जोडली आणि हा व्हिडीओ बनवून अपलोड केला. 

मुख्यमंत्र्यांनी मेडिकल सुरू ठेवले, पण हा पठ्ठ्या काय विकतोय पाहा

व्हिडिओ अपलोड होताच, हा प्रकार लक्षात आल्यावर या तरुणीने पोलिसांत धाव घेत तरुणाविरोधात फिर्याद नोंदवली आहे. या प्रकरणी सिरसाळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

माकडाच्या हाती कोलीत दिल्यासारखा नव्या तंत्रज्ञानाचा गैरवापर अनेकांकडून होत असतो. त्यात असे प्रकार घडण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. टिकटॉक या माध्यमाचा वापर करताना तरुण अनेकदा स्वैर वर्तन करत असल्याचे या आधीही विविध घटनांमधून समोर आले आहे.

ज्येष्ठांना मिळणार घरातच वैद्यकीय सल्ला

क्रिकेटपूर्वी सचिनने केलेय या चित्रपटात काम

सहा महिन्यांच्या बाळाचे शिर कापून फेकले, कुत्र्याने पळवले

परभणीतून फोन आला आणि औरंगाबादेत घडले काय...