नवी मुंबई महापालिकेचा 10 हजार नागरिकांना दणका; नियम न पाळणार्!यांकडून 33 लाख रुपयांची वसुली

सुजित गायकवाड
Thursday, 1 October 2020

कोरोनाला रोखण्यासाठी महापालिकेतर्फे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असताना, बेशिस्तीने राहणाऱ्या नागरिकांचा पालिकेने चांगलाच समाचार घेतला आहे. सरकार नियमांचे उल्लंघन करून सार्वजनिक जागांमध्ये उपद्रव करणाऱ्या तब्बल 10 हजार नागरिकांना पालिकेने दंड ठोठावला आहे. पालिकेने कारवाई केलेल्यांमध्ये मास्क न लावणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. पालिकेच्या या कारवाईमुळे नियम न तोडणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 

नवी मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी महापालिकेतर्फे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असताना, बेशिस्तीने राहणाऱ्या नागरिकांचा पालिकेने चांगलाच समाचार घेतला आहे. सरकार नियमांचे उल्लंघन करून सार्वजनिक जागांमध्ये उपद्रव करणाऱ्या तब्बल 10 हजार नागरिकांना पालिकेने दंड ठोठावला आहे. पालिकेने कारवाई केलेल्यांमध्ये मास्क न लावणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. पालिकेच्या या कारवाईमुळे नियम न तोडणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 

शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आलेख वाढत चालल्याने घरोघरी सर्व्हे करणे, बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेणे, ऍन्टिजेन चाचण्या आणि आरटीपीसीआर चाचण्यांवर भर देणे आदी प्रकारचे प्रयत्न पालिकेतर्फे केले जात आहेत. मात्र, तरीदेखील काही नागरिकांकडून रोज बेशिस्तीचे दर्शन दिसत आहे. भाजीपाला व मासळी बाजार, वाणिज्य संकुले, चहाच्या टपऱ्या, बस डेपो, किरकोळ सामानांची दुकाने आदी सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वैयक्तिक अंतराचा फज्जा उडाला आहे. शिवाय, गर्दीत वावरताना नागरिकांकडून तोंडावर मास्क न लावणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. सध्या हॉटेल सुरू नसल्यामुळे घरोघरी पार्सल पोहोचवणाऱ्या पार्सल बॉयच्या तोंडावरील मास्क गायब झालेला दिसत आहे. 

वाचा : अनलॉकनंतर रायगड जिल्‍ह्यातील पर्यटन बहरतेय

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी शहरात भरारी पथकांची नेमणूक केली आहे. या भरारी पथकांमार्फत शहरात विविध ठिकाणी केलेल्या कारवायांमध्ये पालिकेने 10 हजार नागरिकांकडून तब्बल 33 लाख 30 हजार 450 रुपयांचा दंड वसूल केला आहे. दंड वसूल केलेल्यांमध्ये तोंडावर मास्क न लावणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्याखालोखाल सामाजिक अंतर न पाळणाऱ्या नागरिकांचा समावेश होत आहे. 

बापरे..! : चेंबूर रेल्वेस्थानकाजवळच्या जनता मार्केटमध्ये अग्नितांडव, ९ दुकाने जळून खाक

अवघ्या 15 दिवसांत 70 हजारांचा दंड 
एपीएमसी मार्केटमध्ये वारंवार नियमांचे उल्लंघन होत असल्याने आयुक्त बांगर यांनी 16 सप्टेंबरला भरारी पथकाची नेमणूक केली. तेव्हापासून 30 सप्टेंबरपर्यंतच्या अवघ्या 15 दिवसांत या भरारी पथकाने बेशिस्त नागरिकांवर कारवाई करून तब्बल 70 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. मास्क न लावणाऱ्या नागरिकांकडून 48 हजार 500 आणि अंतर न पाळणाऱ्या 21 हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच, भविष्यातही या पथकामार्फत कारवाई सुरू राहणार असल्याचे बांगर यांनी स्पष्ट केले आहे. 

हाथरस घटना : पीडितेच्या कुटुंबीयांना भेटू न देणे म्हणजे मोदी आणि योगींचीपाशवी दडपशाही - नितीन राऊत 

रुग्णसंख्येबरोबरच चाचण्यांत वाढ 
शहरात ज्या वेगाने रुग्णसंख्या वाढत आहे, त्याच वेगाने महापालिकेतर्फे चाचणी केली जात आहे. सध्या शहरात 74 हजार 687 आरटी-पीसीआर चाचण्या, तर एक लाख 19 हजार 240 ऍन्टिजेन चाचण्या केल्या आहेत. महापालिकेने सुरू केलेल्या लॅबमध्ये आत्तापर्यंत 30 हजार 913 चाचण्या झाल्या आहेत.  

(संपादन : उमा शिंदे)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navi Mumbai Corporation has fined to 10 thousand people. All they were not followed by rules of corona