नवी मुंबईत लवकरच अतिरिक्त 50 व्हेंटिलेटर; अतिदक्षता विभागात खाटांची संख्या वाढणार

सुजित गायकवाड
Thursday, 1 October 2020

बाजारात चांगल्या दर्जाच्या व्हेंटीलेटरअभावी निर्माण झालेल्या तुटवड्यामुळे महापालिकेची व्हेंटीलेटर खरेदी प्रक्रिया रखडली होती. मात्र, काही चांगल्या नामांकित कंपन्यांनी पालिकेला व्हेंटीलेटर पुरवण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर हा तिढा सुटला आहे. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केलेल्या यशस्वी बोलणीनंतर लवकरच महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे स्वतःचे 50 व्हेंटीलेटर उपलब्ध होणार आहेत.

नवी मुंबई : बाजारात चांगल्या दर्जाच्या व्हेंटीलेटरअभावी निर्माण झालेल्या तुटवड्यामुळे महापालिकेची व्हेंटीलेटर खरेदी प्रक्रिया रखडली होती. मात्र, काही चांगल्या नामांकित कंपन्यांनी पालिकेला व्हेंटीलेटर पुरवण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर हा तिढा सुटला आहे. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केलेल्या यशस्वी बोलणीनंतर लवकरच महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे स्वतःचे 50 व्हेंटीलेटर उपलब्ध होणार आहेत. याबाबत "सकाळ'ने बातमी प्रसिद्ध करून समस्या मांडली होती. 

शहरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 36 हजारांच्या पार गेला आहे. रोज सरासरी 300 रुग्णांची वाढ होत असून आतापर्यंत शहरात 750 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येपुढे अतिदक्षता विभागातील खाटा कमी पडू लागल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने अतिदक्षता विभागातील खाटा वाढवण्यावर भर दिला आहे.

वाचा हेही : नवी मुंबई महापालिकेचा 10 हजार नागरिकांना दणका; नियम न पाळणार्!यांकडून 33 लाख रुपयांची वसुली

सध्या शहरात 144 व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत. त्यापैकी एकट्या महापालिकेचे 44 व्हेंटीलेटर आहेत. उर्वरित खासगी रुग्णालयांचे व्हेंटीलेटर आहेत. अतिदक्षता विभागाच्या खाटा वाढवण्यासाठी नेरूळ येथील डी. वाय. पाटील रुग्णालयाने पालिकेसोबत करार केला आहे. या करारानुसार डी. वाय. पाटील रुग्णालयात पालिकेतर्फे लवकरच 30 व्हेंटीलेटर मिळणार असल्याने अतिदक्षता विभागात 124 खाटा उपलब्ध होणार आहेत. 

महत्त्वाची बातमी : नवी मुंबईत गुन्हे शाखेसाठी नव्या पदाची निर्मिती; अपर पोलिस आयुक्तपदी डॉ. शेखर यांची नियुक्ती 

नेरूळनंतर पालिकेतर्फे वाशीतील कामगार विमा रुग्णालयात अतिदक्षता विभागाच्या 125 खाटांचे कोव्हिड केअर रुग्णालय तयार केले जाणार आहे. या रुग्णालयात रुग्णांसाठी सामान्य खाटांसह अतिदक्षता विभागासाठी 40 व्हेंटीलेटर उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी पालिकेतर्फे नवीन व्हेंटीलेटरची खरेदी केली जाणार आहेत. सिडको प्रदर्शन केंद्रातील अतिदक्षता विभागातील खाटा वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. या प्रदर्शन केंद्रातील रुग्णालयात पालिकेतर्फे 75 अतिदक्षता विभागाच्या खाटा तयार केल्या जात आहेत. 

हेही वाचा : २०१९ आधीचे कॉल डिटेल्स मिळणं कठीण, NCB च्या तपासात स्पीडबेकर येण्याची शक्यता

महापालिकेने खरेदी केलेले 50 व्हेंटीलेटर लवकरच आरोग्य विभागाच्या ताब्यात येणार आहेत. आमदार निधीतूनही व्हेंटीलेटरची खरेदी केली आहे. शहरातील रुग्णांची वाढती संख्या पाहता पालिका प्रशासनाचा व्हेंटीलेटर तसेच अतिदक्षता विभागातील खाटा वाढवण्यावर भर राहणार आहे. 
- अभिजित बांगर, आयुक्त,
नवी मुंबई महापालिका 

 

(संपादन : उमा शिंदे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now more 50 Ventilator beds available in Navi mumbai