Corona : नवी मुंबईत 27 'फ्लू क्लिनिक', येथे करा तुमच्या शंकांचं निरसन

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 April 2020

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या मनात भीतीने घर केले आहे. सर्दी, खोकला, ताप असल्याचे जाणवल्यास नागरिकांच्या मनात कोरोनाबाधित असल्याचा संशय निर्माण होत आहे.

नवी मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या मनात भीतीने घर केले आहे. सर्दी, खोकला, ताप असल्याचे जाणवल्यास नागरिकांच्या मनात कोरोनाबाधित असल्याचा संशय निर्माण होत आहे. अशा नागरिकांसाठी महापालिकेने विविठ 27 ठिकाणी फ्लू क्लिनिक सुरू केले आहे. 

मोठी बातमीहायड्रॉक्सीक्लोरिक्विन नंतर 'हे' औषध ठरू शकत गेम चेंजर; भारताचीही 'या' औषधावर आहे नजर

नवी मुंबई महापालिकेतर्फे सुरुवातीपासूनच उपाययोजना करण्याचे ठरवण्यात आले आहे. याप्रमाणेच नागरिकांना ताप, सर्दी, घशात खवखव अशी लक्षणे असल्यास त्यांना घरापासून जवळच तपासणी करता यावी याकरिता महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी नियोजन केले आहे. महापालिकेची 23 नागरी आरोग्य केंद्रे तसेच बेलापूर, नेरूळ, ऐरोली, तुर्भे ही रुग्णालये अशा 27 ठिकाणी फ्लू क्लिनिक सुरू केली आहेत. या ठिकाणी सकाळी 9 ते दुपारी 1 या कालावधीत डॉक्टरांचे पथक वैद्यकीय सेवा पुरवित असून, यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला आहे. फ्लू क्लिनिकमध्ये येणा-या प्रत्येक नागरिकाचे थर्मल स्कॅनिंग केले जात आहे. डॉक्टरांकडून त्यांना ताप, घशात खवखव, खोकला, सर्दी, श्वसनास त्रास अशाप्रकारची लक्षणे आहेत काय, याबाबतची माहिती घेण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकाची तपासणी करून त्यास योग्य औषधोपचार सुचविले जात आहेत. हे औषधोपचार घेतल्यानंतर 2 दिवसांनी पुन्हा त्यांच्या प्रकृतीचा आढावा घेतला जात असून, त्यांच्यामध्ये कोरोनासदृश लक्षणे आढळल्यास स्वॅब कलेक्शन घेतले जात आहेत. 

हे ही वाचा : पैसे नाही, रेशन कार्ड नाही, रोजची उपासमार...; मजुरांचा भाकरीसाठी संघर्ष

आशियातील मोठ्या प्रमाणावर आवक जावक असणा-या एपीएमसीच्या पाच मार्केट्समध्ये कोरोना नियंत्रक वैद्यकीय तपासणी कक्ष सुरू केले आहेत. ताप, सर्दी, खोकला झाल्यास आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची भीती सध्या नागरिकांच्या मनात आहे. ताप, सर्दी, घशात खवखव, श्वास घेण्यास अडचण असणा-या व्यक्तींवर उपचार करण्यासाठी अधिक पर्याय उपलब्ध व्हावेत व ते नागरिकांच्या सोईचे असावेत याकरिता सर्व विभागांमध्ये फ्लू क्लिनिक सुरू केले आहेत. याव्दारे नागरिकांना आरोग्यविषयक आधार मिळत असल्याच्या प्रतिक्रिया अनेक नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

नक्की वाचाआई अन् नवजात चिमुकलीची कोरोनावर मात, वाचा प्रेरणादायी लढा

कोरोना प्रतिबंधासाठी देशव्यापी लॉकडाऊनमधून खासगी दवाखाने, पॅथॉलॉजी लॅब, मेडिकल स्टोअर्स यांना वगळलेले असले तरी काही ठिकाणी दवाखान्यांची जागा लहान असल्यामुळे, सोशल डिस्टन्सिंग पाळता येणे शक्य नसल्याने खासगी दवाखाने बंद ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये ही बाब लक्षात घेऊन विभागवार फ्लू क्लिनिक सुरू करून नागरिकांची आरोग्य तपासणीची अडचण दूर केली आहे.
- अण्णासाहेब मिसाळ, महापालिका आयुक्त

हेल्पलाईनवरून स्वतः करा निदान
नागरिकांनी ताप, घसा खवखवणे, सर्दी किंवा श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे आढळल्यास 022-27567269 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून थेट तज्ज्ञ डॉक्टरांशी संवाद साधावा व आपले शंका समाधान करून घ्यावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात येत आहे. तसेच टेलिफोनिक संवादाव्दारे आणि वेबलिंकव्दारे नागरिकांच्या प्रकृतीची सद्यस्थिती सात प्रश्नांच्या आधारे जाणून घेण्यास सुरुवात केली.

 

 

27 'flu clinics' in Navi Mumbai Helpline for contacting municipal 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 27 'flu clinics' in Navi Mumbai Helpline for contacting municipal