esakal | राज्यात 811 नव्या कोरोनाग्रस्तांची भर, तर इतके जण कोरोनामुक्त, वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

corona

राज्यात 811 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील करोना बाधितांचा आकडा 7, 628 वर पोहोचला आहे

राज्यात 811 नव्या कोरोनाग्रस्तांची भर, तर इतके जण कोरोनामुक्त, वाचा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : राज्यात 811 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील करोना बाधितांचा आकडा 7, 628 वर पोहोचला आहे. शनिवारी 119  रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत राज्यात 1, 076 करोनारुग्ण बरे झाले आहेत.

हे ही वाचा : अक्षय तृतीयाला सोनं खरेदी करायचंय, आहो अशी करा ना मग सोनं खरेदी...

शनिवारी राज्यात 22 करोनारुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यूंपैकी 13 मुंबईत, 4 पुणे महापालिका क्षेत्रात, मालेगावमध्ये 1 मृत्यू , पुणे ग्रामीणमध्ये 1, 1 पिंपरी चिंचवडमध्ये, 1 धुळे येथे; तर 1 मृत्यू सोलापूर शहरात झाला. यांपैकी 16 पुरुष तर 6 महिला होत्या.  22 मृतांपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 11 रुग्ण होते; तर 8 रुग्ण 40 ते 59 वयोगटातील आहेत.  3 रुग्ण 40 वर्षांखालील आहे. मृतांमधील13 रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग असे अतिजोखमीचे आजार आढळले. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 323 झाली आहे. ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 555 कंटेनमेंट झोन क्रियाशील आहेत. शनिवारी 8194 सर्वेक्षण पथकांनी 31 लाख 43 हजार  लोकसंख्येचे सर्वेक्षण केले.  

नक्की वाचा : आता विनाकारण घराबाहेर फिराल तर हवेत उडणारे पोलिस लागतील मागे...

सव्वा लाख लोक होम क्वारंटाईन
सध्या राज्यात 1,25,393 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत; तर 8,124 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच, आतापर्यंत 1,08,972 नमुने कोरोना चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

811 new patients in the state 22 deaths; 119 coronal free
loading image