बलात्कारी आरोपीचे पलायन आणि पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; चक्क महामार्गावर रंगला थरार...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 17 June 2020

बिकास जरनील सिंग (35) असे या ट्रेलर चालकाचे नाव असून पोलिसांनी त्याला बलात्काराच्या गुह्याखाली अटक केली आहे.  

नवी मुंबई (वार्ताहर) : एका असहाय विवाहित तरुणीला पुणे येथे सोडण्याचा बहाणा करुन तिला पनवेल भागात आणून तिच्यावर बलात्कार करुन पळून गेलेल्या ट्रेलर चालकाला पनवेल शहर पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करुन पकडल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. बिकास जरनील सिंग (35) असे या ट्रेलर चालकाचे नाव असून पोलिसांनी त्याला बलात्काराच्या गुह्याखाली अटक केली आहे.  

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, तलावक्षेत्रात पावसाची जोरदार हजेरी​

18 वर्षीय पीडित विवाहित तरुणीला पुणे येथे पतीकडे जायचे होते. त्यामुळे तिने उत्तरप्रदेश येथून मुंबईकडे येणाऱ्या बिकास सिंग याला पुणे येथे सोडण्याची विनंती केली होती. त्यानुसार बिकास सिंग याने तिला ट्रेलरमध्ये घेतले होते. मात्र त्याने पिडीत तरुणीला पुणे येथे न सोडता तिला बुधवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास पनवेल येथील टी-पॉईंटजवळ आणून तिच्यावर बलात्कार करुन पलायन केले होते. 

भाजप नेता मोहित कंबोज यांच्यावर सीबीआयने केला गुन्हा दाखल; वाचा नेमकं प्रकरण काय....​

याबाबतची माहिती नवी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पिडीत तरुणीने आरोपी ट्रेलर चालकाने केलेल्या अत्याचाराची माहिती देऊन त्याचे वर्णन दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमाळे आणि त्यांच्या पथकाने खासगी कारने उरण दिशेने जाणाऱ्या् मार्गावर आरोपी ट्रेलर चालकाचा शोध सुरु केला.  

घरखरेदीने सरकारच्या तिजोरीला मिळाला आधार; लॉकडाऊनमध्ये 'इतक्या' कोटींची महसूलप्राप्ती...​

त्यावेळी एका वेअर हाऊसजवळ पिडीत तरुणीने दिलेल्या माहितीचा ट्रेलर उभा असल्याचे तसेच आरोपी ट्रेलर चालक बिजय सिंग हा आतमध्ये झोपला असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिस उपनिरीक्षक सुनील तारमळे यांनी त्याला बाहेर येण्यास सांगितले. मात्र, यावेळी बिजय सिंग याने ट्रेलर चालू करुन पनवेलच्या दिशेने पळ काढला. त्यामुळे पोलिसांनी देखील त्याचा पाठलाग सुरु केला. यावेळी आरोपी बिजय सिंग याने उलटसुलट ट्रेलर चालवून पोलिसांना चकविण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी टी पॉईंट येथे येऊन सदर ट्रेलर थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या ठिकाणी तो थांबला नाही. 

बीसीसीआयचा आयसीसीशी पंगा; आयपीएल घेणारच...​

त्यामुळे पोलिसांनी त्याचा पुन्हा पाठलाग सुरु करतानाच त्याला पकडण्यासाठी पळस्पे चेकपोस्ट येथे रस्त्यावर ट्रेलर आडवा लावून रोड बंद केला.  सदर ठिकाणी पोहचल्यानंतर आरोपी बिजय सिंग याने ट्रेलर त्याच ठिकाणी थांबून ट्रेलरमधून उडी टाकून पळ काढला. अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची अधिक चौकशी केल्यानंतर त्याने पिडीत तरुणीवर बलात्कार केल्याचे कबुल केले. त्यानुसार पोलिसांनी बिजय सिंग याला बलात्काराच्या गुह्यात अटक केली.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accused in waman abusement case in panvel caught in panvel highway