Maratha Reservation: मंत्रालयाला ठोकलं टाळं; आंदोलकांनंतर आता आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वपक्षीय आमदार आक्रमक

मराठा आंदोलनाच्या मागणीसाठी आता राज्यातील आंदोलक, शासनकर्ते यांच्यासह लोकप्रतिनिधी देखील आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे
Maratha Reservation
Maratha ReservationEsakal

मराठा आंदोलनाच्या मागणीसाठी आता राज्यातील आंदोलक, शासनकर्ते यांच्यासह लोकप्रतिनिधी देखील आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. आज मुंबईत मंत्रालयासमोर सर्वपक्षीय आमदारांनी आंदोलन केलं. त्याचबरोबर या आमदारांनी मंत्रालयाला टाळं ठोकलं आहे. जोपर्यंत मराठा आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत मंत्रालयाचे कामकाज चालू न देण्याचा इशारा या आमदारांनी दिला आहे.

मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय आमदार मंत्रालयासमोर आंदोलन करत आहेत. यावेळी आमदारांकडून मंत्रालयालाला टाळं लावण्यात आलं आहे. कोणत्याही मंत्र्याला आम्ही मंत्रालयात जाऊ देणार नाही. मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलवा, अशी मागणी हे आमदार करत आहेत.

Maratha Reservation
Maratha Reservation: सर्कशीत आला अन्‌..गावाचा लाडका झाला; मराठा आरक्षणासाठी आत्महत्या; विलासची मन हेलावणारी कहाणी

मंत्रालयाच्या परिसरात सध्या सर्वपक्षीय आमदार आंदोलन करत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन केलं आहे. राजू नवघरे, अमोल मिटकरी, राहुल पाटील, कैलास पाटील, विक्रम काळे, चेतन तुपे, बाबासाहेब आजबे, यशवंत माने, निलेश लंके , बाळासाहेब पाटील, दिलीप बनकर, बाबाजानी दुर्रानी, मोहन उबर्डे हे आमदार मंत्रालयाच्या समोर आंदोलन करत आहेत.

Maratha Reservation
Maratha Reservation: मराठा आरक्षणावर तोडगा निघणार? मुख्यमंत्र्यांनी आज बोलावली तातडीची सर्वपक्षीय बैठक

मराठा आरक्षणासंदर्भात तातडीने विशेष आधिवेशन बोलवावं अशी मागणी या आमदारांची आहे, यावेळी आंदोलन करणाऱ्या आमदारांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, 'महिला आरक्षणाकरिता संसदेचे विशेष आधिवेशन बोलवलं त्यावर तोडगा निघाला, त्याप्रमाणे महाराष्ट्र विधानसभेने एक दिवसाचे अतितात्काळ आधिवेशन बोलवावं, मराठा आंदोलनाच्या संदर्भात ज्या मराठा समाजाच्या भावना आहेत, मागण्या आहेत त्या पुर्ण कराव्यात. यासाठी आम्ही मंत्रालयाला टाळं ठोकलं आहे.'

Maratha Reservation
Kunbi Caste Certificate: कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रक्रिया काय? 'असे' तपासा पुरावे...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com