esakal | 'या' प्रवाशांनाही लोकल प्रवासाची परवानगी द्या; भाजप आमदाराने केली मागणी

बोलून बातमी शोधा

local

राज्य सरकार आणि केंद्राच्या सहमतीने अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या शासकीय आणि खासगी कर्मचाऱ्यांसाठी मुंबई उपनगरातील लोकलची सेवा 15 जुन पासून सुरू केली आहे.

'या' प्रवाशांनाही लोकल प्रवासाची परवानगी द्या; भाजप आमदाराने केली मागणी
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : राज्य सरकार आणि केंद्राच्या सहमतीने अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या शासकीय आणि खासगी कर्मचाऱ्यांसाठी मुंबई उपनगरातील लोकलची सेवा 15 जुन पासून सुरू केली आहे. मात्र, यामध्ये पत्रकार, कॅमेरामॅन, माध्यमातील इतर कर्मचारी आणि बँकेतील कर्मचाऱ्याना सुद्धा प्रवासाची परवानगी देण्याची मागणी आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

नक्की वाचा : खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करु नये, 'सामना'तून काँग्रेसवर निशाणा

शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती 15 टक्के तर खासगी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती 10 टक्के अनिवार्य असल्याने, अत्यावश्यक सेवा देणऱ्या कर्मचाऱ्यांची प्रवास करण्याची संख्या वाढली आहे. त्यामूळे राज्य सरकारने केंद्राला मुंबई उपनगरातील काही लोकल सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र, यामध्ये मंत्रालयातील कर्मचारी, आरोग्य विभाग, महानगरपालीका, पोलीस अशाच कर्मचाऱ्यांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. यामधून काही अत्यावश्यक सेवेतील खासगी कर्मचारी, बँक कर्मचारी आणि पत्रकार, कॅमेरामॅन आणि मिडीयातील इतर कर्मचारी आणि बँक कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले आहे. त्यामूळे या कर्मचाऱ्यांना सुद्धा लोकल प्रवासाची परवानगी देण्याची मागणी आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. तसे कदम यांनी ट्विट केले आहे. 

मोठी बातमीचिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा रद्द; बाप्पाची मूर्ती घडणार मंडपातच...

पत्रकार अत्यावश्यक सेवेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधीत करतांना पत्रकार सुद्धा अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याचा उल्लेख केला आहे. मात्र, पत्रकारांना अत्यावश्यक सेवेतील कोणत्याही सुविधा मिळत नसल्याची खंत अनेक पत्रकार संघंटनांनी व्यक्त केली आहे. 

हे वाचलंत का : काँग्रेसचा बडा नेता म्हणतोय, मलाही आत्महत्या करायचे विचार यायचे...

पत्रकार सुद्धा कोविड योद्धा
राज्यातील घडामोडीच्या आढावा घेण्यासाठी फिल्डवर बातमीदारी करतांना अनेक पत्रकारांना कोरोनाची लागन झाली होती. त्यानंतर पत्रकारांनी सुद्धा कोरोना विरुद्ध लढाई जिंकून पुन्हा फिल्डवर बातमीदारीसाठी सज्ज झाले आहे. त्यामूळे एक अंगाने पत्रकार सुद्धा कोविड -19 योद्धे आहे.

मोठी बातमी : सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबावर आणखी एक दुःखाचा डोंगर 

पत्रकारांना कोव्हिड -19 च्या पार्श्वभुमीवर बातमीदारी करण्यासाठी त्याची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी फिल्डवर जावे लागते, सुरक्षा व्यवस्था सांभाऴून पत्रकार आतापर्यंत बातमीदारी करत आले आहे. राज्य आणि केंद्र सरकारने पत्रकारांना अत्यावश्यक सेवेत यापुर्वीत सामील करून घेतले आहे. आरोग्य मंत्र्यांनी पोलीस आणि आरोग्या कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर पत्रकारांना सुद्धा 50 लाखांचे विमा कवच देण्याची मागणी मान्य केली आहे. त्यामूळे रेल्वेच्या प्रवासात सुद्धा इतरांना मिळणारी सुविधा पत्रकारांना मिळावी ही मागणी आहे. 
- दिलीप सपाटे, अध्यक्ष, मंत्रालय आणि विधीमंडळ पत्रकार वार्ताहर संघ

Allow local passengers to travel; Demand made by BJP MLA