वाडिया जमीन हडपण्याचा डाव हाणून पाडू, महाराष्ट्रातील मोठ्या पक्षाचा इशारा..

वाडिया जमीन हडपण्याचा डाव हाणून पाडू, महाराष्ट्रातील मोठ्या पक्षाचा इशारा..

मुंबई - वाडिया रुग्णालयाला पालिकेकडून अनुदान मिळालेले नाही. यामध्ये जो काही वाद आहे तो ताबडतोब मिटवून हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरु करावे, अन्यथा जागा हडपण्याचा तुमचा डाव आम्ही हाणून पाडण्यासाठी रस्त्यावर उतरू, असा इशारा भाजपाने दिला आहे. तसे पत्र आमदार आशिष शेलार यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना दिले आहे. 

वाडिया ट्रस्ट आणि पालिका यांच्यात वाद सुरु असताना त्यात आता राजकीय पक्षांनी उडी घेतली आहे. मनसेच्या आंदोलनानंतर भाजपाचे आमदार आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना याबाबत पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी वाडिया ट्रस्ट आणि पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा रुग्णालयाची जमीन हडपण्याचा डाव असल्याचा आरोप केला आहे. हे रुग्णालय गरिबांना परवडणारे असे रुग्णालय आहे. यामुळे महापौरांनी राजकीय दबावाला बळी न पडता त्वरित बैठक घेऊन रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरु करावे, असे आवाहन केले आहे. असे न झाल्यास जमीन हडपण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी रस्त्यावर उतरू असा इशारा शेलार यांनी दिला आहे. 

लोढा यांची राज्यपालांकडे मागणी 
आर्थिकदृष्ट्या आजारी पडलेल्या परळ मधील वाडिया रुग्णालयास राज्य सरकार व महापालिकेने त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी राज्यपालांकडे व महापालिका आयुक्तांकडे केली आहे. 

राज्य सरकार आणि महानगरपालिकेने आर्थिक मदत रोखल्यामुळे मुलांवरील उपचारासाठी प्रसिद्ध असलेले हे रुग्णालय बंद होण्याच्या मार्गावर आहे. महापालिकेने याबाबत त्वरित निर्णय घ्यावा तसेच सरकारने रुग्णालयास आर्थिक मदत देण्याबाबत राज्यपालांनी आदेश द्यावा. पैसेच नसल्याने रुग्णालयातील अनेक सेवा बंद पडल्या आहेत. रुग्णालयाला सप्टेंबर 2019 पासून निधी न मिळाल्यामुळे रुग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे.

यासंदर्भात राज्यपालांनी तातडीने हस्तक्षेप करणे आवश्‍यक आहे, असे लोढा यांनी यासंदर्भात लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. 

ashish shelar writes a letter to kishori pednekar over wadi hospital issue

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com