esakal | एच पूर्वचे सहाय्यक आयु्क्त अशोक खैरनार यांचे कोरोनामुळे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

ashok khairnar

मुंबईतील अनेक पोलिस, डॉक्टर्स, नर्सेस, अधिकारी यांना कोरोनाची लागण झाली असून काही जणांचा त्यात मृत्यू झाल्याचेही समोर आले. त्यापाठोपाठ आता मुंबई महापालिकेच्या आणखी एका अधिकाऱ्याचे निधन झाल्याची बातमी समोर येत आहे. 

एच पूर्वचे सहाय्यक आयु्क्त अशोक खैरनार यांचे कोरोनामुळे निधन

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : कोरोनाचा मुंबईतील संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वसामान्य नागरिकांसोबतच कोरोना योद्ध्यांनाही कोव्हिडची बाधा होत असल्याचे समोर आले आहे. मुंबईतील अनेक पोलिस, डॉक्टर्स, नर्सेस, अधिकारी यांना कोरोनाची लागण झाली असून काही जणांचा त्यात मृत्यू झाल्याचेही समोर आले. त्यापाठोपाठ आता मुंबई महापालिकेच्या आणखी एका अधिकाऱ्याचे निधन झाल्याची बातमी समोर येत आहे. 

कोरोना नियंत्रणासाठी पालिकेचा नवा फॉर्म्युला; उपनगरातील 6 प्रभागात लागू...

एच पूर्व प्रभागाचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांचे आज कोरोनामुळे निधन झाले. ते 57 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून तसेच एक भाऊ, दोन बहिणी व मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्यावर फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरु होते. आज सायंकाळी चार वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. एच पूर्व वांद्रे, सांताक्रुझ, खार या विभागांची जबाबदारी खैरनार यांच्यावर होती. 

कल्याणमध्ये कोरोना पसरण्याचा धोका; कारण वाचून तुम्हालाही धक्का बसेल.... ​

झोपडपट्टीबहुल भागात जून महिन्यांच्या सुरुवातीला रुग्णवाढीचा दर 2.1 टक्के होता. मे महिन्यात तो त्याहून अधिक होता. खैरनार पालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांबरोबर स्वतः रस्त्यावर उतरले होते. सध्या या प्रभागातील रुग्णवाढीचा दर 0.50 टक्के आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालाधी 112 दिवसांवर आहे. हा मुंबईतील सर्वाधिक कालावधी असून संपूर्ण शहराच्या सरासरीच्या दुप्पट आहे. मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा दर 50 दिवसांचा आहे. संक्रमण रोखण्यासाठी खैरनार यांनी स्वतः पुढाकार घेतला होता. मात्र त्यांचेच कोरोनामुळे निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

मनसेचे पुन्हा खळखट्याक;  छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्यावरून संताप...​

धुळे महानगरपालिका हद्दीतील मोहाडीचे मूळ रहिवासी असलेले खैरनार यांचे शालेय शिक्षण मोहाडीमध्येच झाले होते. विद्युत शाखेतील पदविका शिक्षण त्यांनी धुळे शहरातील शासकीय तंत्रनिकेतन येथून पूर्ण केले .त्यानंतर मुंबईतील व्ही. जे. टी. आय. महाविद्यालयातून त्यांनी अभियांत्रिकीय पदवी आणि आयआयटी पवई या संस्थेतून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली होती. 

शाब्बास! धारावीतील संसर्ग नियंत्रणात आणल्यामुळे WHO कडून कौतुकाची थाप

खैरनार हे फेब्रुवारी 1988 पासून मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत होते. जानेवारी 2018 पासून ते सहाय्यक आयुक्तपदी कार्यरत होते. 'जी उत्तर' विभागाचे सहाय्यक आयुक्त असताना महापरिनिर्वाण दिनानिमित्त केलेल्या विशेष कामगिरीचा गौरव म्हणून अशोक खैरनार यांना तत्कालिन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याहस्ते 'जानेवारी 2019' साठी 'ऑफीसर ऑफ द मंथ' या बहुमानाने विशेष सन्मानित करण्यात आले होते.
----
संपादन ः ऋषिराज तायडे