
Bhiwandi Lok Sabha Election Results: भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील बहुचर्चित मतदार संघ पैकी एक होता. कारण या ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडून केंद्रीय मंत्री कपिल पाटील स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे उभे होते. यंदा कपिल पाटील यांना लोकसभा मतदारसंघात हॅट्रिक करण्याची संधी होती. मात्र त्यांचा सुरेश म्हात्रे यांनी पराभव केला.
भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा 2009 यावर्षी उदयास आला. त्यावेळी पहिला निवडणुकीमध्ये काँग्रेसने या ठिकाणी विजय मिळवला. मात्र त्यानंतर झालेल्या 2014 आणि 2019 या दोन निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचे कपिल पाटील निवडून आले होते. (Bhiwandi Constituency Lok Sabha Election Result)
भिवंडी लोकसभा मतदारसंघांमध्ये शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी हे महत्त्वाचे परिसर येतात. 2019 साली झालेल्या निवडणुकीमध्ये कपिल पाटील यांनी काँग्रेसच्या केशव तावरे यांचा दीड लाख मतांनी पराभव केला होता. त्यावेळी कपिल पाटील यांना पाच लाख 23 हजार मतं मिळाली होती. तर काँग्रेसला तीन लाख 67 हजार मतं मिळाली होती.
शरद पवार गटविरुद्ध भारतीय जनता पक्ष असा जरी हा प्रथमदर्शनी सामना दिसत असला तरी देखील जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला. यामुळे यंदा या ठिकाणी तिरंगी झाली.
भिवंडी लोकसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भाग येतो. या ठिकाणी बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. याचबरोबर वाढत्या महागाईचा फटका हा थेट शेतकऱ्यांना देखील बसला होता. भिवंडी लोकसभेमध्ये मुसलमान समाजातील मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत. अशावेळी या ठिकाणी मुसलमान मतदार नक्की कोणाला मतदान करतो हे पाहणं देखील अतिशय उत्सुकतेच असणार आहे.
कपिल पाटील यांनी आपण भिवंडीचा मोठ्या प्रमाणावर विकास केला असल्यास म्हटलं होते व येत्या काळात असाच विकास करू असंही आश्वासन दिलं होत. अशावेळी कपिल पाटील यांना भिवंडीचा मतदार साथ देतो का? हे पाहणं अतिशय उत्सुकतेच होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.