
जनताच मतपेटीतून नशा उतरवते; चित्रा वाघांचा शिवसेनेवर हल्लाबोल
मुंबई : राजद्रोहाच्या गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेलेल्या राणा दाम्पत्याला नुकताच अटी-शर्थींसह जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, जामीन मिळाल्यानंतर खासदार नवनीत राणा (Navneet Rana) मुंबईतील लिलावती रूग्णालयात उपचार घेत होत्या. त्यावेळी त्यांच्या काही चाचण्या करण्यात आल्या. त्यातील MRI करतानाचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यानंतर आज मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) आणि मनिषा कायंदे यांनी थेट रूग्णालयात जात लिलावतीच्या प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला. शिवसेनेच्या या भूमिकेनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करत शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. (Chitra Wagh Tweet On Shivsena)
चित्रा वाघ यांनी केलेल्या ट्वीटमध्ये त्या म्हणल्या की, नवनीत राणा यांनी जामीन मिळाल्यानंतर लीलावती हॉस्पिटलमध्ये (Lilawati Hospital) उपचार घेतल्यावर तेथे MRI करताना काढण्यात आलेल्या फोटोवरून शिवसेनेने लिलावतीत जाऊन दादागिरी केली.सत्ता डोक्यात जाते तेव्हा जनताच एक दिवस ती नशा मतपेटीतून उतरवते असे म्हणत वाघ यांनी तो दिवस फार लांब नाही, असे सूचक विधान केले आहे. (Navneet Rana MRI Photo)
हेही वाचा: नवनीत राणांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट; म्हणाल्या...
नेमकं प्रकरण काय?
नवनीत राणा स्पाँडिलायसिसचे उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. यावेळी त्यांचा MRI काढण्यात आला. यावेळी MRI काढत असतानाचे त्यांचे काही फोटो प्रसिद्ध झाले होते. यावरूनच पेडणेकर यांनी आक्षेप घेतला आहे. नवनीत राणांचा MRI नक्की झाला की नाही? झाला असेल तर रुग्णालय प्रशासनाने त्याला अहवाल सादर करावा. MRI रुममध्ये रुग्णासोबत एकाच व्यक्तीला परवानगी असताना राणांसोबत चार लोक कसे गेले. सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडीओ मला द्या, अशी मागणीही पेडणेकर यांनी रूग्णालय प्रशासनाकडे केली.
राणांना रुग्णालयात शूटिंगची परवानगी कशी देण्यात आली, असा सवालही शिवसेनेने रुग्णालय प्रशासनाला केला आहे. त्याचबरोबर स्पाँडिलायसिस असताना नवनीत राणांनी उशी कशी काय वापरली, असा प्रश्नही पेडणेकरांनी उपस्थित केला. दरम्यान, या सर्व घडामोडींनंतर रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे तसंच दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन शिवसेनेला दिलं आहे.
Web Title: Bjp Chitra Wagh Criticize Shivsena On Navneet Rana Mri Photo
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..