रुग्णवाहिकेअभावी महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू; तब्बल तासाभरानंतर आली रुग्णवाहिका....

रुग्णवाहिकेअभावी महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू; तब्बल तासाभरानंतर आली रुग्णवाहिका....

मुंबई : कोरोना साथीच्या काळात रुग्णवाहिका वेळत पोहचल्या नसल्याने अनेक रुग्णांना जीव गमवावा लागल्याचे प्रसंग घडले होते. आता त्याचे लोण थेट महापालिका मुख्यालयापर्यंत पोहचले आहे. 108 क्रमांकाची रुग्णवाहिका महापालिकेत पोहोचायला तब्बल तासाहून जास्त वेळ झाला तरी न पोहोचल्याने हृदयविकाराचा झटका आलेल्या कर्मचाऱ्यांला जीव गमवावा लागला आहे. एवढंच नव्हे तर महापालिकेत अनेक वाहने उभी असतात मात्र एकही वाहनचालक त्या कर्मचाऱ्याला रुग्णालयापर्यंत पोहचण्यास तयार झाला नसल्याचेही समोर आला.

महापालिकेचे सहाय्यक चिटणीस अजित दुखंडे यांना 29 जुलै रोजी महापालिका मुख्यालयात पोहोचल्यावर हृदयविकाराची लक्षणं जाणवू लागली. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यावर त्यांनी तत्काळ सहकाऱ्यांना ही गोष्ट सांगितली. सहकारी त्यांना मुख्यालयात असलेल्या दवाखान्यात घेऊन गेल्यावर श्‍वास घेण्यास त्रास असल्याने त्यांना कोव्हिडची बाधा असल्याची शक्‍यता सांगत रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यावर त्यांच्या सहकाऱ्यांनी पालिकेच्या नियंत्रण कक्षात धाव घेऊन रुग्णवाहिका मागितली. मात्र,108 क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका मागवून घ्या, असा सल्ला नियंत्रण कक्षातून देण्यात आला. तात्काळ 108 क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका मागवण्यात आली. मात्र, ही रुग्णवाहिका मुख्यालयात पोहोचायला एक तासाहून अधिक वेळ गेला.

त्यानंतर नायर रुग्णालयात पोहोचल्यावर दुखंडे यांची तात्काळ कोव्हिड चाचणी करण्यात आली. त्यांना कोव्हिडची बाधा नसल्याचे लक्षात येताच डॉक्‍टरांनी त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. महापालिका मुख्यालयात अनेक वाहने उभे असतात. दुखंडे यांच्या सहकाऱ्यांनी काही वाहनचालकांना मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात येण्याची विनंती केली. मात्र, कोव्हिडच्या भीतीमुळे एकही चालक येण्यास तयार झाले नाही.

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो आणखी लांबणीवर; प्रकल्पाचे केवळ चार टक्केच काम पूर्ण..

यापूर्वीही घडली घटना
काही वर्षांपूर्वी शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक मेराज शेख यांना महासभा सुरु असतानाच अर्धांगवायूचा झटका आला होता. तेव्हाही रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकले नव्हती. सुदैवाने मेराज यांनी या आजारावर मात केली असून निरोगी जीवन जगत आहे.

5 हजार खाटांच्या महारुग्णालयाची तयारी सुरू; पालिकेने जमिनीसाठी मागितले अर्ज

50 लाख नुकसानभरपाई द्या

महापालिका मुख्यालयाजवळ रुग्णवाहिका उपलब्ध नसणे, तसेच कर्मचाऱ्यालाच रुग्णवाहिका न मिळणे हा धक्कादायक प्रकार आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाने दुखंडे यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांचे अर्थसहाय्य द्यावे, अशी मागणी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी महापालिका आयुक्त इक्‍बाल सिंह चहल यांच्याकडे केली आहे. तसेच महापालिका मुख्यालयात कायमस्वरुपी रुग्णवाहिका उपलब्ध करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

जे.जे. रुग्णालयाचे अनोखे संशोधन; विनासंसर्ग होईल रुग्णांची ने-आण...

रुग्णवाहिका व्यस्त होती
महापालिका मुख्यालयासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील रुग्णवाहिका वापरण्यात येते. ही रुग्णवाहिका त्यावेळी दुसऱ्या कॉलवर होती. मात्र, पालिकेच्या नियंत्रण कक्षामार्फत समन्वय करुन 45 मिनीटांच्या आत रुग्णवाहीका उपलब्ध करुन दिली. अवघ्या 11 मिनिटांत रुग्णवाहिका नायर रुग्णालयात पोहोचली. असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
----
संपादन : ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com