esakal | डॉ. आंबेडकरांनी सुरु केलेल्या सिद्धार्थ महाविद्यालयाची दुरवस्था; विकासासाठी माजी विद्यार्थी एकवटले...
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. आंबेडकरांनी सुरु केलेल्या सिद्धार्थ महाविद्यालयाची दुरवस्था; विकासासाठी माजी विद्यार्थी एकवटले...

डॉ. आंबेडकर यांनी सुरु केलेले सिद्धार्थ महाविद्यालय वाणिज्य व अर्थशास्त्र आणि सिद्धार्थ विधी महाविद्यालय ही दोन्ही महाविद्यालये एकाच इमारतीमध्ये भरतात. ही इमारत जुनी असल्याने इमारतींची दुरुस्ती होणे आवश्यक आहे.

डॉ. आंबेडकरांनी सुरु केलेल्या सिद्धार्थ महाविद्यालयाची दुरवस्था; विकासासाठी माजी विद्यार्थी एकवटले...

sakal_logo
By
तेजस वाघमारे

मुंबई : फोर्ट येथील सिध्दार्थ महाविदयालयाच्या आनंद भवन या इमारतीची दुरावस्था झाली आहे. इमारतीवरील छत तुटल्याने पावसाचे पाणी वर्गात येऊन इमारतीचे नुकसान झाले आहे. या इमारतीच्या विकासकामाचा सुमारे 9 कोटी रुपयांचा प्रस्ताव समाज कल्याण विभागाकडे रखडला आहे. हा निधी तातडीने मंजूर करून महाविद्यालय सुरु होण्यापूर्वी दुरुस्तीचे काम पूर्ण करावे, यासाठी माजी विद्यार्थांची संघटना असलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी विकास समिती मुंबई यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले आहे.

मातोश्रीवर कोरोनाची पुन्हा धडक! तेजस ठाकरे यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना केले क्वारंटाईन...

डॉ. आंबेडकर यांनी सुरु केलेले सिद्धार्थ महाविद्यालय वाणिज्य व अर्थशास्त्र आणि सिद्धार्थ विधी महाविद्यालय ही दोन्ही महाविद्यालये एकाच इमारतीमध्ये भरतात. ही इमारत जुनी असल्याने इमारतींची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. मात्र संस्थेकडे निधी नसल्याने या इमारतीची दुरवस्था झाली आहे. छतावरील पत्रे जीर्ण झाल्याने पावसाचे पाणी वर्ग खोल्यात येते.

ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह, ट्विटरवरुन दिली माहिती

यामुळे चौथ्या मजल्यावरील वर्गखोल्या अत्यंत जीर्ण झाल्या आहेत. यामुळे विद्यार्थांची आसन व्यवस्थाही विस्कळित झाली आहे. त्यामुळे या इमारतीच्या दुरुस्तीसाठी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी महाविद्यालयाची डागडुजी करण्यासाठी बांधकाम नकाशा व खर्चाचे अंदाजपत्रकाचा प्रस्ताव समाजकल्याण सहायक आयुक्त मुंबई शहर यांच्याकडे सादर केला. हा प्रस्ताव या कार्यालयाने प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण मुंबई विभाग यांच्याकडे सादर केला आहे. मात्र या कार्यालयाने या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केल्याने महाविद्यालयाच्या इमारतीची दुरुस्ती रखडली आहे.

कांदिवली येथे रेल्वेची ट्रकला धडक; सुदैवाने मोठा अपघात टळला...

इमारतीची दुरुस्ती रखडल्याने गोरगरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित रहाण्याची भिती, पीपल्स एज्युकेशन सोसायटी विकास समितीचे पदाधिकारी ऍड. कैलास केदारे, ऍड. प्रज्ञेश सोनवणे आणि ऍड. संघराज गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. लॉकडाऊन असल्याने सध्या महाविद्यालयात विद्यार्थी येत नाहीत. त्यामुळे इमारतीच्या दुरुस्तीसाठी तातडीने निधी मंजूर करून द्यावा आणि इमारतीचे काम सुरू करावे, अशी मागणी संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

उद्यापासून कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती सुरु; व्यापाऱ्यांसह नागरिकांना दिलासा

दरेकर यांनी दिली महाविद्यालयाला भेट
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सोमवारी (ता.20) फोर्ट येथील सिध्दार्थ महाविद्यलयाला भेट दिली. राज्य सरकारने महाविद्यालयाच्या दुरुस्तीसाठी 9 कोटीचा निधी तात्काळ उपलब्ध करुन न दिल्यास या महाविद्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
---
संपादन : ऋषिराज तायडे