esakal | संचालकांसह सात जणांना 'सीबीआय' कडून अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

संचालकांसह सात जणांना 'सीबीआय' कडून अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : जेईई मेन्स (JEE) २०२१ च्या परीक्षेत (Exam) गैरप्रकार झाल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) (CBI) आज सात जणांना अटक केली. त्यात नोएडातील (Noyda) खासगी संस्थेच्या दोन संचालकांचाही समावेश आहे.

आआयटी' 'एनआयटी' मध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेल्या जेईई परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली होती. ऑनलाइन परीक्षेदरम्यान रिमोट विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनीच प्रश्नपत्रिका सोडविल्याचा आणि त्याबदल्यात प्रचंड मोठी रक्कम स्वीकारल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणी सीबीआयने ऑफिनिटी एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेविरोधात आणि सिद्धार्थ कृष्णा, विश्वंभरमणी त्रिपाठी, पेविंद वार्ष्णेय या तिच्या संचालकांविरोधात गुन्हा नोंदविला होता. इतरही काही जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता.

हेही वाचा: चाईल्ड पॉर्नोग्राफी प्रकरणी मुंबईतील 30 वर्षीय व्यक्ती विरोधात गुन्हा - सीबीआयने दाखल केला गुन्हा

सीबीआयने आज कृष्णा त्रिपाठीसह ऋतिक सिंह, अंजुम दावूदानी, अनिमेषकुमार सिंह, अजिंक्य पाटील यांना अटक केली. तसेच, रणजितसिंह ठाकूर या व्यक्तीलाही अटक केली आहे. वार्ष्णेय हे फरार झाल्याची शक्यता आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु असून बंगळूरमधील संशयित सूत्रधाराचाही शोध सुरु आहे.

हेही वाचा: पुणे पोलिसांना विद्यार्थ्यांकडून रक्षाबंधनानिमत्त राख्यांची भेट

आरोपी संचालक अनेक

विद्यार्थ्यांकडून पैशांची हमी म्हणून त्यांची १० वी आणि १२ वीची गुणपत्रिका, युझर आयडी, पासवर्ड, धनादेश घेऊन ठेवत असे. निकाल लागल्यानंतर प्रत्येक उत्तीर्ण विद्यार्थ्याकडून १२ ते १४ लाख रुपये घेतले जात असत,असा आरोप आहे.

loading image
go to top