mankhurad
mankhurad

काय सांगता ! कोरोनाच्या संकटात 'या' इतक्या मोठ्या भागात आरोग्य यंत्रणा पोहोचलीच नाही?

मुंबई : मानखुर्द येथील शिवाजी नगर भागात आरोग्य यंत्रणा अद्याप पोहोचलेली नाही. या भागात गेल्या महिनाभरात जंतूनाशक फवारणी आणि नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली नाही, असे सांगण्यात आले. येथील 70 टक्के रहिवाशांची परिस्थिती बिकट असून, उपासमार सुरू आहे.

मुंबईतील सर्वच भागांत कोरोना पोहोचला आहे. शिवाजी नगर भागातही कोरोनाचे रुग्ण आढळण्याची शक्यता आहे. परंतु, आरोग्य यंत्रणा गायब असल्याचे रहिवासी शाहिद शेख यांनी सांगितले. आरोग्य यंत्रणाच नसल्यामुळे रुग्ण सापडणार कसे, असा सवालही त्यांनी केला. डम्पिंग ग्राऊंडच्या जागेत वसलेल्या देवनार झोपडपट्टीची लोकसंख्या सुमारे 70 हजार आहे. या भागातील 30 टक्के रहिवासी छोटे व्यावसायिक असून, 70 टक्के लोकांचा उदरनिर्वाह मजुरी, कचरा गोळा करणे, भंगार विक्री, कचऱ्यात सापडलेल्या वस्तूंची विक्री अशा कामांवर चालतो. 

अत्यंत दाटीवाटच्या या भागात एका लहानशा झोपडीत 10 ते 12  लोक राहतात. अमली पदार्थांचे सेवन करणारे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचाही येथे वावर असतो. त्यामुळे आरोग्य खात्यातील कर्मचारी या भागात जाण्यासाठी घाबरतात. त्यामुळे आरोग्य यंत्रणा पोहोचलेली नाही, असे स्थानिकांनी सांगितले. दरम्यान, या भागात काही ठिकाणी जंतूनाशक फवारणी केल्याचे आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तपासणी पथके लवकरच पोहोचतील, असेही ते म्हणाले. 

दोन वेळचे जेवण हवे
महापालिकेच्या पुढाकाराने स्थलांतरित कामगार आणि बेघर व्यक्तींना दोन वेळच्या जेवणासाठी तीन लाख १४ हज़ार अन्न पाकिटांचे मोफत वितरण केले जाते. परंतु, या भागातील अनेक रहिवाशांची उपासमार सुरू आहे. दोन वेळच्या जेवणाची काही तरी व्यवस्था करा, अशी मागणी होत आहे.
 

In the Corona crisis, the health system has not reached such a large area

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com