esakal | Dawoods brother Anees Ibrahim under scanner of indian security agencies

बोलून बातमी शोधा

Dawood ibrahim

दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिम भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर

sakal_logo
By
दीनानाथ परब

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा छोटा भाऊ अनिस इब्राहिम भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आहे. तस्करी आणि अमलीपदार्थाच्या रॅकेटमध्ये अनिस इब्राहिम थेट सहभाग आहे. त्यामुळे तपास यंत्रणा त्याच्या मागावर आहेत. अनिस इब्राहिमचा जवळचा साथीदार कैलाश राजपूत मुंबई पोलीस आणि एनसीबीच्या वाँटेड लिस्टमध्ये आहे. कैलाश राजपूत संयुक्त अरब अमिरातीमधील हायप्रोफाईल ड्रग ऑपरेटर आहे. कैलाश राजपूत भारतातून ड्रग्ज तस्करीचे रॅकेट चालवतो. उच्चपदस्थ सूत्रांनी IANS ला ही माहिती दिली.

या वर्षाच्या सुरुवातीला NCB ने रायगडमधुन अरीफ भुजवालाला अटक केली. त्यानंतर अनिस इब्राहिम या ड्रग्ज तस्करीच्या रॅकेटमध्ये गुंतला असल्याचे समोर आले. "चौकशीमध्ये अरीफ भुजवालाने कैलाश राजपूतच्या संपर्कात असल्याचे सांगितले. तपास यंत्रणांनी कैलाश दुबईमध्ये असल्याचे शोधून काढले" असे या तपासाशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर, NCB भारतात डी कंपनीचे ड्रग्ज रॅकेट चालवणाऱ्यांच्या मागावर आहे. दाऊदचा साथीदार चिकू पठाणला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीतून अरीफ भुजवालाचे नाव समोर आले. त्याला रायगडमधुन अटक केली. आपण दुबईला गेलो होतो, तिथे अनिसचा फायनान्सर कैलाश राजपूतला भेटल्याचे अरीफ भुजवालाने सांगितले.