नवी मुंबईकरांची करवाढीतून मूक्तता ! अर्थसंकल्पिय अंदाजपत्रक सादर 

नवी मुंबईकरांची करवाढीतून मूक्तता ! अर्थसंकल्पिय अंदाजपत्रक सादर 

नवी मुंबई  : महापालिका प्रशासनाने गेल्या वर्षीच्या सादर केलेल्या जून्या प्रकल्पांना चालना देणारे अर्थसंकल्पिय अंदाजपत्रक आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी आज स्थायी समितीसमोर सादर केले. तब्बल 3 हजार 850 कोटी रूपयांमधून 3 हजार 848 कोटी रूपये विविध विकास कामांवर खर्च केले जाणार असल्याचे अंदाजपत्रक मांडण्यात आले आहे. या अंदाजपत्रकात फारशी मोठी प्रकल्प महापालिकेने मांडलेली नसली तरी सलग 25 व्या वर्षी नवी मुंबईकरांना पुन्हा एकदा मालमत्ता व पाणीपट्टी करवाढीतून मूक्तता मिळाली आहे. परंतू करवाढ होत नसल्यामुळे पाणीपट्टी वसूलीत 14 टक्के आर्थिक तूट होत असल्याची कबूलीही प्रशासनाने देत भविष्यात पाणीकरात वाढ करण्याची तरतुद अंदाजपत्रकात केली आहे. 

महापालिका निवडणूका असतानाही प्रशासनातर्फे नागरीकांवर कोणत्याच नव्या योजना व प्रकल्पांची घोषणा या अंदाजपत्रकात करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे महापालिकेने यंदा नुसत्याच घोषणांवर भर न देता गेल्यावर्षीतील अर्धवट अवस्थेमधील प्रकल्प पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सिडकोकडून हस्तांतर न झालेले 520 भूखंड, एमआयडीसीकडून येणारे 233 भूखंड पदरात पाडून घेण्याचे काम पूढील वर्षात केले जाणार आहे. याखेरीज एमआयडीसीमध्ये नवीन रस्ते पालिकेतर्फे केले जाणार आहेत. दिव्यांगांच्या स्टॉल्सकरीता सिडकोकडून अतिरीक्त जागा मागणे, बहुउद्देशीय इमारतींचा विनियोग, जनसायकल सहभाग प्रणालीत वाढ, नौका विहार ठिकाणांमध्ये वाढ, मार्केटमध्ये वाढ करण्याचा मानस प्रशासनाने व्यक्त केला आहे. 

  • खर्चाचा रूपया - 384 कोटी 48 लाख 91 हजार 
  • नागरी सुविधा - 987 कोटी
  • प्रशासकीय सेवा - 638 कोटी
  • पाणी पुरवठा व मलनिःस्सारण - 580 कोटी
  • उद्यान व मालमत्ता - 389 कोटी
  • ई-गव्हर्नस - 22 कोटी
  • सामाजिक विकास - 43 कोटी
  • स्वच्छ महाराष्ट्र व घनकचरा व्यवस्थापन - 429 कोटी
  • केंद्र व राज्य सरकारच्या योजना - 90 कोटी
  • आरोग्य सेवा - 166 कोटी
  • परीहवन सेवा - 96 कोटी
  • आपत्ती निवारण व अग्निशमन - 85 कोटी
  • सरकारी कर परतावा - 116 कोटी
  • शिक्षण - 152 कोटी
  • कर्ज परतावा - 38 कोटी
  • अतिक्रमण - 11 कोटी 


नवीन प्रकल्प मिळणार : 

रस्त्यांचा विकास 
ठाणे-बेलापूर मार्गावर अत्याधुनिक साधने व साहित्याचा वापर करून या मार्गाचा विकसित केला जाणार आहे. वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने या रस्त्यावर पर्याय उपलब्ध केला जाणार आहे. पामबीच मार्गाचाही विकास होणार आहे. मार्गावरील सिडकोकाळातील पामची झाडे सूकत चालली आहेत. त्याऐवजी नवीन चेहरा पामबीच मार्गाला देण्याचा प्रशासनाच्या विचाराधिन आहे. तसेच पामबीच मार्गावरील दुभाजकांचा विकास केला जाणार आहे. 

वृद्धाश्रम तयार करणार 
नवी मुंबई शहरातील ऐकूण लोकसंख्येपैकी वृद्धांची संख्या जास्त आहे. शहरात सेवानिवृत्त झालेले व मूलांनी टाकून दिलेल्या वृद्धांसाठी पालिकेतर्फे वृद्धाश्रम तयार केले जाणार आहे. सिडकोकडून मिळालेल्या भूखंडांपैकी एका जागेवर हे आश्रम उभारण्यात येणार आहे. तसेच नोकरदार महिलांच्या मूलांना सांभाळण्यासाठी डे-केअर सेंटर देखील सुरू करण्याचा पालिकेचा मनोदय आहे. 

हवा मापन केंद्र उभारणार 
शहरातील प्रदूषण वातावरण बदल व बदली पर्जन्य स्थिती या विविध परीणामांच्या मापनाची गरज वेळोवेळी लागत असते. त्यासाठी अत्यधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक नोडमध्ये एक हवा मापन यंत्र उभारण्यात येणार आहे. 16 कोटी 84 लाख रूपये खर्च करून हे नागरी मंत्रालयाच्या सूचनेनुसार 5 चौरस किलोमीटरवर एक या प्रमाणे शहरात पर्जन्य मापन यंत्रणा उभारण्यात येणार आहे. इको सिटी प्रकल्पांतर्गत रेल्वे स्थानकांपासून विविध भागात बॅटरीवरील चालणाऱ्या वाहनांचा वापर करण्यासाठी शहरात ठिक-ठिकाणच्या अंतरावर चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. बेलापूर येथे अत्याधुनिक साधनसामुग्रीने सुसज्ज अशी पर्यावरन प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. 

आरोग्य विभाग कात टाकणार 
शहरातील सर्व रुग्णालयांमध्ये माफक दरात डायलेसीस सेवा सुरू करण्यात येणार आहे. आरोग्य सेवांचे संगणकीकरण केले जाणार आहे. अद्यायावत पशुवधगृह उभारण्यात येणार आहे. तसेच विद्युत पशुदहन व्यवस्था व पशु वैद्यकीय रुग्णालय बांधण्यात येणार आहे. 

अपंगांवर उपचार केंद्र सुरू करणार 
चाल वर्षात महापालिकेचे आरोग्य विभाग व ईटीसी केंद्रांच्या वतिने अपंगांचे त्वरीत निदान व उपचार करता यावेत याकरीता केंद्र सुरू केले जाणार आहे. महापालिकेच्या 13 ग्रंथालयात अंध व अपंग व्यक्तींकरीता स्वतंत्र कक्षासहीत अधुनिक सेवासुविधा उपलब्ध करून देणे तसेच ईटीसी केंद्रांमध्ये अंध दिव्यांग व्यक्तींकरीता अत्याधुनिक सर्व सुविधांनी सुसज्ज असे रिसोर्स सेंटर सुरू केला जाणार आहे. 

जून्या प्रकल्पांना चालना : 

शहरात नवे उड्डाणपूल 
शहरात गतिमान वाहतूकीच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी वाशी सेक्‍टर 17 येथे महात्मा फुले चौक ते कोपरी उड्डाणपूलापर्यंत उन्नत मार्ग बांधणे, घणसोली ते ऐरोली पामबीच रस्त्यावर पूल उभारणे, आग्रोळी तलाव ते कोकण भवन येथे उड्डाणपूल उभारणे, शहरातील आवश्‍यक ठिकाणी पादचारी पूल व भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहेत. 

ऐरोलीकरांना बायोगॅस युनिट मिळणार 

ऐरोलीतील चिंचपाडा येथे खासदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत घनकचरा, सांडपाणी व इतर टाकाऊ वस्तूंच्या वापरातून सामुहीक बायोगॅस युनिट बांधण्याचे काम सद्या पालिकेतर्फे करण्यात येत आहे. या प्रकल्पातून सुमारे 500 मेगावॅट वीज निर्मिती होईल त्यावर परिसरातील रस्त्यांवरील दिवे उजळणार आहेत. 

टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्ट तयार करणे, सिवूड्‌समध्ये सायन्स सेंटर सुरू करणे, तुर्भे येथे क्षेपणभूमीच्या नव्या विभागासाठी जागा खरेदी करणे, डेब्रीजपासून विटा व सिमेंटचे ठोकळे तयार करण्याचा प्रकल्प, शहरात सिसीटीव्ही लावणे, विद्युत दिव्यांचे खांब बदलणे, शुन्य कचरा झोपडपट्टी संकल्पना आदी जूने प्रकल्पांना नव्याने चालना देण्याचे काम केले जाणार आहे. 

detail report on navi mumbai municipal corporations estimated budget

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com