प्रसुतीला वेळ आहे नंतर या.., डॉक्टरांनी हाकलून दिलेल्या महिलेने घरीच दिला बाळाला जन्म

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 April 2020

प्रसूतीकळा येऊ लागल्याने उल्हासनगरातील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात गेलेल्या गर्भवती महिलेला डॉक्टरने प्रसूतीला वेळ असल्याचे सांगून दोनदा हाकलून दिले.

उल्हासनगर : प्रसूतीकळा येऊ लागल्याने उल्हासनगरातील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात गेलेल्या गर्भवती महिलेला डॉक्टरने प्रसूतीला वेळ असल्याचे सांगून दोनदा हाकलून दिले. शेवटी शनिवारी सायंकाळी त्या महिलेने घरातच बाळाला जन्म दिला. हा धक्कादायक प्रकार अशोका फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष शिवाजी रगडे यांनी समाज माध्यंमात प्रसारीत केल्याने डॉक्टरांच्या असंवेदनशील पणा बद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मोठी बातमी : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला सुरुवात

कॅम्प नंबर 3 मधील सम्राट अशोक नगरमध्ये राहणाऱ्या एका 26 वर्षीय महिलेने डॉक्टरचे निर्दयी रूप बघितले आहे. सकाळी प्रसूतीकळा येऊ लागल्याने ही महिला तिच्या पतीसोबत सुमारे दोन किलोमीटर पायी चालत शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात गेली. पण प्रसूतीला अद्याप वेळ आहे असे डॉक्टरांनी सांगितल्यावर पती पत्नी पायीच घरी परतले.

महत्वाची बातमी  : खासगी रुग्णालयांबाबत महापौरांची आयुक्तांकडे 'ही' मागणी

पुन्हा तिला दुपारच्या वेळी प्रसूतीच्या असह्य वेदना होऊ लागल्या. यावेळी अतितात्काळ रुग्णांच्या सेवेसाठी उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ ठेवण्यात आलेल्या एका रिक्षाचालकाला बोलावण्यात आले. महिला रिक्षात रुग्णालयात गेली. पण पुन्हा अजून प्रसूती करिता वेळ असल्याचे सांगून डॉक्टरांनी वेळ मारून नेली. पुन्हा दुसऱ्यांदा माघारी परतलेली महिला सायंकाळच्या सुमारास प्रसूतीच्या वेदनेने विव्हळू लागली. शेजारच्या तीन चार आजीबाई धावल्या त्यांनी आणि महिलेची सुरक्षित प्रसूती केली. हा प्रकार शिवाजी रगडे यांना समजताच त्यांनी महिलेचे घर गाठले. बाळाची नाळ कापायची आणि महिलेला इंजेक्शन द्यायचे असल्याने रगडे यांनी तुम्ही दोनदा हाकलून दिलेल्या महिलेची घरीच प्रसूती झाली आहे. बाळाची नाळ कापायची व महिलेला इंजेक्शन द्यायचे आहे असे सांगितल्यावर डॉक्टरांनी रुग्णालयात महिलेला रुग्णालयात दाखल करून घेतले.

हे ही वाचा : काय सांगता ! 'सिगारेट' ओढल्याने कोरोनाचा धोका कमी? वाचा कोणी केलाय हा दावा

शिवाजी रगडे यांनी या प्रकाराबात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे व आरोग्य विभागाच्या संचालकांकडे ईमेल द्वारे तक्रार केली असून समाजमाध्यमात डॉक्टरांच्या असंवेदनशिलतेबाबत रोष व्यक्त केला आहे. 

नक्की वाचा :  कौतुकास्पद ! धकधकता वणवा विझवण्यासाठी दोन तरुणांचं धाडस, वाचा चित्तथरारक अनुभव

शिकाऊ डॉक्टरमुळे प्रकार घडला ?
यासंदर्भात शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुधाकर शिंदे यांना विचारणा केली असता, आम्ही रुग्णालयातच मिटिंगमध्ये होतो. सदर महिला व तिचा पती माझ्याकडे आला असता तर दाखल करून घेतले असते पण त्यांनी शिकाऊ डॉक्टर्स कडे विचारणा केल्याने हे सर्व घडले. आता ही महिला व तिचे बाळ रुग्णालयात असून दोघेही सुरक्षित असल्याचे डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले.

 

The doctor fired him twice The woman gave birth to the baby at home


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The doctor fired him twice The woman gave birth to the baby at home