डोंबिवलीत प्रदूषणकारी कंपन्यांना परवानगी नकोच! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फाईल फोटो

डोंबिवलीकरांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

डोंबिवलीत प्रदूषणकारी कंपन्यांना परवानगी नकोच!

डोंबिवली : गेल्या मार्च महिन्यात डोंबिवली एमआयडीसीमधील  प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या रासायनिक आणि धोकादायक अशा एकूण 21 कंपन्यांना प्रदूषण मंडळाने बंदच्या नोटीसा दिल्या होत्या. या भूमिकेचे डोंबिवलीकरांनी स्वागत केले होते. अनेक घटनांनी हादरणारी डोंबिवली  प्रदूषणमुक्त वातावरणात मोकळा श्वास घेत आहे. त्यामुळे डोंबिवलीकरांच्या जीवावर उठलेल्या प्रदुषणकारी कंपन्यांना लॉकडाऊन काळात आणि त्यानंतरही परवानगी देऊ नये अशी विनंती डोंबिवलीकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विविध माध्यमातून करत आहेत.

गुड न्यूज आली,  कोरोना संक्रमित मातांकडून 203 सुखरूप बाळांचा जन्म

एमआयडीसी  निवासी परिसरातील रहिवाशांना कंपन्यातून सोडल्या जाणा-या उग्र वासामुळे श्वसन ,खोकला व इतर आजारांनी ग्रासले होते. आता लॉकडाऊन मुळे लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत  बहुसंख्य नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारीत कमालीची घट झाली आहे. श्वसनाचा त्रास व  खोकल्यामुळे येथील येथिल नागरिकांना वारंवार दवाखाना गाठावा लागत होता. लॉकडाऊन काळात  कंपन्यांच्या हालचाली मंदावल्या असल्या तरी बऱ्याच कालावधी नंतर आपल्याला सुदृढ आरोग्य लाभल्याचे येथील नागरिक सांगतात. तसेच स्फोट, आगीच्या घटनाचे चक्र थांबल्यामुळे एरव्ही चिंताग्रस्त असलेली रात्रीची झोपही आता चिंतामुक्त होऊन घेता येत आहे.

अप्रतिम ! लॉकडाऊनमध्ये जोपासला अनोखा छंद, पक्षांच्या पिसांवर कोरलेली कलाकृती थक्क करणारी

लॉकडाऊन काळातही प्रदूषणकारी कंपन्याना परवानगी देऊ नये अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अशा कंपन्यांना परवानगी दिली तर पुन्हा " रात्रीस खेळ चाले" असे म्हणत  घातक वायू, सांडपाणी कंपन्यांकडून सोडले जाईल अन डोंबिवलीकर पुन्हा डोंबिवलीचे भोपाळ तर होणार नाही ना? या  चिंतेच्या काळ्या सावटाखाली जीवनाचा संघर्ष करत राहील अशी घालमेल नागरिकांच्या मनात सुरू आहे.  याबाबत कल्याण ग्रामीण परीसरतील डॉ कुणाल  पाटील यांनी सांगितले की, धूळ,  खराब हवा यांची ऍलर्जी येणे, खोकला इत्यादी रुग्णांची संख्या सुमारे 50 टक्क्यांनी  कमी झाली  आहे. 

 'त्या' व्हिडिओवरुन काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा भाजपवर हल्लाबोल

प्रदूषणामुळे श्वसनाचे विकार
प्रदूषणकारी कंपन्या बंदच ठेवा अशी मागणी मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम यांनीही  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. वारंवार प्रदुषणाच्या त्रासाने डोंबिवलीकरांना श्वसनाचे त्रास होत असतात हे सिद्ध झाले आहे. कोरोनामुळे आधीच  नागरिक भयभीत झाले असून श्वसनाचा त्रास झाला तर खाजगी रुग्णालयेही डोंबिवलीकरांना कोव्हिड रुग्णालयात पाठवतील आणि हा विषय चिंतेचा होईल असेही कदम यांनी नमूद केले आहे. 

आजपासून भाजपचं राज्यभर 'महाराष्ट्र बचाओ आंदोलन'

गेल्या 30  वर्षांपासून आम्हाला जसे प्रदुषणमुक्त वातावरण पाहिजे आहे ते गेल्या दोन महिन्यापासून अनुभवता आले आहे. प्रदूषण नसल्याने दमा, डायबेटीस, हार्ट च्या समस्या असणाऱ्या नागरिकांन आता कोणताही त्रास होत नाही. लॉकडाऊन नंतरही असेच चित्र राहावे. 
- राजू नलावडे,
जागरूक नागरिक 

यंदाच्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाबाबत मोठी अपडेट

सतत येणाऱ्या उग्र वासामुळे नैसर्गिकरित्या मन प्रफुल्लित राहात नाही. प्रदूषणामुळे मेंदू मधील आनंदित ठेवणारा जो घटक असतो त्यावर परिणाम होतो. प्रदूषण नसल्यास  मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा चांगला होतो. त्यामुळे मेंदूची प्रक्रिया चांगली राहून शरीरातही आनंदाचे हार्मोन्स तयार होऊन मन आनंदित होते. 
- डॉ. अद्वैत पाध्ये,
मानसोपचारतज्ञ

Don't allow polluting companies!