लॉकडाऊनमुळे ऑनलाईन गेमची मागणी ५० टक्‍क्‍यांनी वाढली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 एप्रिल 2020

लॉकडाऊनमुळे घरात बसून कंटाळलेले लोक करमणुकीचे साधन म्हणून ऑनलाईन गेमकडे वळले आहेत. मागील 15 दिवसांत ऑनलाईन गेमच्या मागणीत 40 ते 50 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. पबजी, स्पार्टन पोकर, ल्युडो किंग, कॅण्डी क्रश, रमी या खेळांच्या वापरकर्त्यांमध्ये 20 ते 30 टक्‍क्‍यांची भर पडली आहे. 

मुंबई : लॉकडाऊनमुळे घरात बसून कंटाळलेले लोक करमणुकीचे साधन म्हणून ऑनलाईन गेमकडे वळले आहेत. मागील 15 दिवसांत ऑनलाईन गेमच्या मागणीत 40 ते 50 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. पबजी, स्पार्टन पोकर, ल्युडो किंग, कॅण्डी क्रश, रमी या खेळांच्या वापरकर्त्यांमध्ये 20 ते 30 टक्‍क्‍यांची भर पडली आहे. 

ही बातमी वाचली का? महाराष्ट्राबाबत देशात चिंता; महामुंबई, पुण्यामुळे परिस्थिती चिघळली 

लॉकडाऊनमुळे घरातच असलेल्या जवळपास प्रत्येकाकडे स्मार्ट फोन आहे. त्यामुळे समाज माध्यमे, ऑनलाईन गेमिंग आदी माध्यमांतून मित्र-मैत्रिणींशी संवाद साधला जात आहे. आतापर्यंत युवावर्गातच क्रेझ असलेल्या ऑनलाईन गेमिंगकडे प्रौढ व्यक्तीही मोठ्या प्रमाणात वळल्या आहेत. या "मोठ्या' गेमर्सची संख्या 20 ते 30 टक्‍क्‍यांनी वाढल्याचे सांगितले जाते.

ही बातमी वाचली का? व्यसनी लोकांनी आता सिगारेटची दुकानेही फोडली

भारतात ऑनलाईन गेमिंग 10 वर्षांपासून असले, तरी मागील एक-दोन वर्षांतच "युजर्स' लक्षणीय प्रमाणात वाढले आहेत. प्रत्येकाकडे असलेला स्मार्टफोन, समाज माध्यमांची उपलब्धता, वेगवान इंटरनेट आदी सुविधांमुळे ऑनलाईन गेमिंग व्यवसाय भरभराटीला आला आहे. आता ऑनलाईन गेममध्ये वैविध्याची मागणी होत असल्याचे स्पार्टन पोकरचे व्यवस्थापकीय संचालक अमिन रोझानी यांनी सांगितले. 

ही बातमी वाचली का? सारखी शिंक येतीये कोरोना तर नाही ना

ऑनलाईन गेम व्यवसायात भारत अजून मागे असला, तरी भविष्यात येथील बाजारपेठ झपाट्याने विकसित होणार आहे. ऑनलाईन गेमर्समध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तंत्रज्ञान विकसित होत असून, या क्षेत्रातील स्पर्धा वाढत आहे. 
- अमिन रोझानी, स्पार्टन पोकर. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: due to Lockdown demand of online games increased by 50 percent