इंधन दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले! मुंबईत भाजीपाला, दूध आणि प्रवास महागला; घरखर्चात मोठी वाढ

Mumbai Fuel Price Hike: मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढणाऱ्या किमतींमुळे महागाईची नवी लाट आली आहे. इंधनाच्या किमतींचा परिणाम आता भाजीपाला आणि इतर दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमतींवर होत आहे.
Mumbai Fuel Price Hike

Mumbai Fuel Price Hike

ESakal

Updated on

मुंबई : जागतिक कच्च्या तेलाच्या संकटामुळे मुंबईतील महागाईने पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका दिला आहे. पेट्रोलचे दर प्रति लिटर १०९ रुपयांच्या जवळ पोहोचल्याने आणि डिझेलचे दर प्रति लिटर ९५ रुपयांच्या वर गेल्याने प्रत्येक कुटुंबाचे मासिक बजेट विस्कळीत होत आहे. वाढत्या इंधन दरांचा परिणाम आता केवळ वाहनांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर टॅक्सी आणि ऑटोचे भाडे, भाजीपाला, दूध, अन्नधान्य आणि इतर दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमतींवरही तो दिसून येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com