गडकरी दूरदृष्टी असलेले नेते, CM शिंदेंनी केलं तोंड भरून कौतुक

भाजप-शिवसेना युतीचे सरकार असनाता गडकरींनी मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गासाठी भरीव काम केलं
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeSakal
Summary

भाजप-शिवसेना युतीचे सरकार असनाता गडकरींनी मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गासाठी भरीव काम केलं

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ओळख आणि दूरदृष्टी सर्वांना माहित आहे. गडकरींकडे दूरदृष्टी असल्याने त्यांनी अनेक मोठे प्रकल्प राबवले आहेत. १९९५ मध्ये भाजप-शिवसेना युती सरकार असताना त्यांनी मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गासाठी भरीव काम केलं आहे. हा माहामार्ग व्हावा ही बाळासाहेब ठाकरे यांची ईच्छा होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळेच मुंबई-पुणे महामार्ग बनला, असं प्रतिपादन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केलं आहे. आज ते मुंबईत आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मंत्री गडकरी यांचं कौतुक केलं आहे.

CM Eknath Shinde
स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रभाग रचनेचा 'मविआ'चा निर्णय रद्द करा - बावनकुळे

CM शिंदे म्हणाले, गडकरी यांनी मुंबईत ५५ फ्लायओव्हर तयार करुन घेतले. त्यावेळी नागरिकांनी हे कशासाठी याची काय गरज आहे का असे सवालही केले होते. मात्र आता तेही फ्लायओव्हर कमी पडत आहेत. गडकरी हे दूरदृष्टी असणार नेते आहेत. सुरुवातीपासून भविष्यात कशाची आवश्यकता भासणार यावर त्यांचा अभ्यास असतो. मुंबई-पुणे महामार्ग हा गडकरींमुळे बनला. काही तासांत लोक त्यांच्यामुळेच हा प्रवास करु शकत आहेत, असही त्यांनी सांगितलं आहे.

यावेळी मुंख्यमंत्र्यांनी खालापूर ते सिंहगड इन्स्टिट्युट पर्यंत होणाऱ्या नव्या बोगद्यासंदर्भात भाष्य केले. ते म्हणाले, या बोगद्यामुळे आता मुबंई आणि पुणे अजून जवळ येणार असून २० ते २५ मिनीटांचा वेळ वाचणार आहे. समृद्धी हायवेसंदर्भात ते म्हणाले की, हा एक गेम चेंजर प्रकल्प असणार आहे. देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रकल्प आहे. त्यांनी ही जबाबदारी मंत्री असताना माझ्यावर सोपवली होती आणि मी ती पार पाडली आहे. राज्यात अनेक असे प्रकल्प राबवले जाणार आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

CM Eknath Shinde
गद्दार कोणाला म्हणता? तुम्ही बाळासाहेबांचे नातू असाल तर..., केसरकरांनी खडसावलं

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com