नवी मुंबई : महापालिकेकडून नवरात्रोत्सवानिमित्त वस्तूंचे प्रदर्शन व विक्री

महिलांच्या कलागुणांना वाव
mumbai
mumbaisakal

नवी मुंबई : महिलांच्या निर्मिती क्षमतेला ऊर्जेला योग्य संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजना उपक्रमांच्या माध्यमातून नवी मुंबई महापालिका नेहमीच आघाडीवर असते, असे अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी सांगितले. महिलांनी बनविलेल्या विविध वस्तूंच्या विक्रीकरिता व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित प्रदर्शनप्रसंगी त्या बोलत होत्या.

नवी मुंबई महापालिका बेलापूर विभाग कार्यालयातर्फे सीवीडी बेलापूर येथील वारकरी भवनमध्ये नवरात्रोत्सवाचे औचित्याने महिला स्नेहसंमेलन व महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री उपक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी सनराईज कैंडल्स अँड ओशोनी व्हिजन फॉर द ब्लाईंड वेल्फेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भावेश भाटिया, उपक्रमाच्या आयोजक बेलापूर विभागाच्या सहा. आयुक्त डॉ. मिताली संचेती, नागरी आरोग्य केंद्र सीबीडी बेलापूरच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. दर्शना वाघमारे तसेच माजी नगरसेवक, नगरसेविका आदी उपस्थित होते.

mumbai
सोलापूर महापालिका निवडणूक नेतृत्वाबाबत शरद पवार घेणार निर्णय

दिव्यांगाना मेणवत्ती निर्मिती उद्योगाच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारे व्याख्याते डॉ. भावेश भाटिया यांनी शेरोशायरीच्या माध्यमातून व्यवसायविषयक अनुभव कथन केले. व्यवसाय करताना मार्केटिंग महत्त्वाचे असल्याचे सांगत ग्राहकांशी सौजन्यपूर्ण संवाद, वस्तू विक्रीचे कौशल्य याविषयी त्यांनी अनेक महत्त्वाच्या सूचना केल्या. दोन दिवसीय प्रदर्शनामध्ये महिलांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तुंचे २३ स्टॉल्स लावण्यात आले होते.

mumbai
आंदोलनाची आठवण असावी; शेतकऱ्यांना मोफत टॅटू काढून देणारा स्टॉल 

रुचकर खाद्यपदार्थांचे स्टॉल दिव्यांगांनी निर्माण केलेल्या मेणबत्ती व इतर वस्तुंचा स्टॉल तसेच कपडे, पिशव्या, पर्सेस, खेळणी व इतर आकर्षक वस्तुंचे स्टॉल्ससह ४ स्टॉल्स महिला वचत गटांसाठी होते. कोरोना प्रभावित व्यवसायाला आलेली शिथिलता कमी करून महिला बचत गट तसेच दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी व्यासपीठ मिळावे हा प्रयत्न असल्याचे डॉ. मिताली संचेती यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com