बंदोबस्ताला तैनात असणाऱ्या महिला पोलिसाच्या हाताचा आरोपीने घेतला चावा

crime
crime sakal

मुंबईच्या फोर्टमधील मुंबई उच्च न्यायालय परिसरात बंदोबस्ताला तैनात असणाऱ्या महिला पोलिसाच्या हाताचा महिला आरोपीने चावा घेतल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. याप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी महिला अफसाना अब्बास अली खातून अन्सारीला पोलिसांनी अटक केली आहे

crime
Dhule Crime News : हाडाखेडजवळ साडेआठ लाखांचा मद्यसाठा जप्त

पोलीस कर्मचारी निकीता कदम या उच्च न्यायालयाच्या शुक्रवारी सुरक्षेसाठी तैनात होत्या. त्यावेळी आरोपी महिला अफसाना अब्बास अली खातून अन्सारी उच्च न्यायालय परिसरात महिला गोंधळ करत होती. तिला निकिता कदम यांनी समजवण्याचा प्रयत्न केला असता तिने कदम यांच्या डाव्या हाताचा चावा घेतला. यासोबतच इजा पोहोचवण्याच्या उद्देशाने नखाने ओरबडले.

तेथे उपस्थित नागरिकांनी अन्सारी हिला समजवण्याचा प्रयत्न केला. पण संतापलेल्या अन्सारीने लाथेने कदम यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर इतर पोलिसांनी हा प्रकार थांवबला. त्याचवेळी पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून मदत मागवण्यात आली. त्यानुसार आझाद मैदान पोलिसांची मोबाईल व्हॅन घटनास्थळी दाखल झाली.

crime
Dharashiv Crime News : राष्ट्रीय महामार्गावर वाटमाऱ्यांचा अड्डा

घडलेल्या प्रकारानंतर अन्सारीला ताब्यात घेऊन आझाद मैदान पोलीस ठाण्यात आणण्यात आले. याप्रकरणी कदम यांच्या तक्रारीवरून महिला पोलिसाला मारहाण करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे , जखमी करणे, धमकावणे आदी विविध कलमांतर्गत अन्सारीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर आझाद मैदान पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली. महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या हाताला जखमा झाल्या आहेत. याप्रकरणी तपास सुरू असल्याची ोलिसांकडून माहिती मिळत आहे,

crime
Umarga Crime : सरकारी वकिलाला जबर मारहाण करुन अनोळखी व्यक्तींनी केली लुटमार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com