स्टेट बँकेकडून आली गुडन्यूज, कर्जांवरील प्रोसेसिंग फी संदर्भातील महत्वाची बातमी

स्टेट बँकेकडून आली गुडन्यूज, कर्जांवरील प्रोसेसिंग फी संदर्भातील महत्वाची बातमी

मुंबई : आगामी सणासुदीच्या दिवसांसाठी स्टेट बँकेने वाहन, सोने आणि पर्सनल लोन या कर्जांवरील प्रोसेसिंग फी (प्रक्रिया शुल्क) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे मान्यताप्राप्त गृहप्रकल्पांच्या कर्जांना देखील ही सवलत मिळेल. या सर्वांचे व्याजदर दहा टक्क्यांखाली आले आहेत. 

त्यांच्या योनो बँकिंग मोबाईल ऍप्लिकेशनवरून घेतलेल्या कर्जांसाठी ही सुविधा मिळेल. ग्राहकांनी घेतलेल्या गृहकर्जाची रक्कम तसेच ग्राहकांचा क्रेडिट स्कोअर यानुसार गृहकर्जासाठीच्या व्याजदरात एक टक्का सवलतही दिली जाईल. त्याखेरीज योनो ऍप वरून अर्ज करणाऱ्यांना व्याजदरात आणखी अर्धा टक्का जास्त सवलत मिळेल. त्यांच्या वाहनकर्जाचे दर साडेसात टक्क्यांपासून सुरु होत असून विशिष्ठ प्रकारच्या वाहनांसाठी शंभर टक्के कर्जही दिले जाईल.

सोन्यासाठी कर्ज हवे असल्यासही त्याचा व्याजदर साडेसात टक्के एवढाच आहे. या कर्जाच्या परतफेडीची मुदतही तीन वर्षांपर्यंत आहे. पर्सनल लोनचे व्याजदरही 9.6 टक्क्यांपर्यंत घटविण्यात आले आहेत.  ही माहिती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (रीटेल व डिजिटल बँकिंग) सी. एस. शेट्टी यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या वाचा : 

good news from SBI processing fees on personal loans and two wheeler loans are waved off 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com