ठाणे जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी; ठिकठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत... 

राहुल क्षीरसागर
Wednesday, 5 August 2020

ठाणे शहरात मागील 12 तासात 123.67 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. या कालावधीत शहरात कृष्ण भवन येथे इमारतीच्या बाल्कनीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. तर, घोडबंदर रोड येथील श्री राम हॉस्पिटलची 7 ते 8 फुटाची संरक्षक भिंत कोसळली.

ठाणे : सोमवार मध्यरात्री पासून सुरु झालेल्या पावसाने मंगळवारी सकाळी दमदार बटिंग केल्यानंतर बुधवारीही पावसाने दमदार हजेरी लावली. मंगळवारी सकाळी 8.30 ते बुधवार सकाळी 8.30 या कालावधीत जिल्ह्यात 66.08 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तर, ठाणे शहरात गेल्या 12 तासात 123.67 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. यावेळी शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी झाडे, झाडांच्या फांद्या उन्मळून पडणे, पाणी साचण्याच्या तसेच झाडे उन्मळून गाड्यांवर पडल्याने अनेक वाहनांचे नुकसान झाले.  

मुंबईची लाईफलाईन पुन्हा ठप्प; तीनही रेल्वेमार्गावर पाणी भरले...

भिवंडी शहर व ग्रामीण भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊन ठिकठिकाणी सखल भाग पाण्याखाली जाऊन जलमय झाला आहे. तर, कल्याण-डोंबिवलीमध्येही देखील पावसाने चांगलीच दमदार हजेरी लावल्यामुळे ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटनांसह 3 गायीचा शॉक लागून दुर्दवी मृत्यू झाला. तर, अनेकांच्या घरात पावसाचे पाणी घुसले. या कोसळणाऱ्या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते.

 

नवी मुंबई आयुक्तांचा कामाचा धडाका, कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरु

ठाणे जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात सोमवारी मध्यरात्री पासून सुरु झालेल्या पावसाने मंगळावर पाठोपाठ बुधवारीहि दमदार हजेरी लावली. या पावसामुळे मंगळावर सकाळी 8.30 ते बुधवार सकाळी 8.30 या 24 तासात 144.24 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. त्यामुळे शहरात तुळशीधाम, तीन हात नाका, मनीषानगर कळवा, बी.आर.नगर, सावरकर नगरमध्ये मार्केटमध्ये आदी 13 ठिकाणी झाडे, तर, चेंदणी कोळीवाडा, बारा बंगला कोपरी आदी 7 ठिकाणी झाडांच्या फांद्या उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. तर, बारा बंगला बीएसएनएल कंपाऊड, घोडबंदर आनंद नगर, वागळे इस्टेट आदी भागात पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच पोखरण रोड येथील जलसा सोसायटीची संरक्षक भिंती तीन चारचाकी वाहनांवर पडल्याने त्यांचे नुकसान झाले. या व्यतिरिक्त शहरात मंगळवारी कुठलीही गंभीर घटना घडल्याची नोंद करण्यात आली नसल्याची माहिती ठाणे महपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्यावतीने देण्यात आली. 

सामनाच्या फ्रंट पेजवरील सूचक जाहिरात म्हणतेय, "हे ज्यांनी केले, त्यांचा मला अभिमान आहे !"

ठाणे शहरात मागील 12 तासात 123.67 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. या कालावधीत शहरात कृष्ण भवन येथे इमारतीच्या बाल्कनीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. तर, घोडबंदर रोड येथील श्री राम हॉस्पिटलची 7 ते 8 फुटाची संरक्षक भिंत कोसळली. तसेच ठाणे शरः वाहतूक विभागाच्या तीनहात नाका, महापे रोड शिळफाटा आदी 11 ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. त्यात घोडबंदर रोड येथील ऋतू इस्टेट झाड उन्मळून दुचाकी गाड्यांवर पडल्याने आठ दुचाकींचे नुकसान झाले. तर, आनंद नगर घोडबंदर रोड, कोपरी बारा बंगला, श्री राम हॉस्पिटल घोडबंदर रोड आदी 5 ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्याची माहिती ठाणे महपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने देण्यात आली.   

महाड शहरात पूरस्थिती; सावित्री नदीच्या पुराचं पाणी शहरात, नागरिकांमध्ये घबराट

दरम्यान,  मंगळवार पासून सुरू झालेल्या पावसाने बुधवारीही संततधार कायम ठेवल्यामुळे त्याचा परिणाम लोकल सेवेवरही परिणाम झाला. तसेच जिल्ह्यातील विविध भागातून मुंबईत जाणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही त्याचा मोठा फटका बसला. त्यात भिवंडी शहर व ग्रामीण भागात अनेक दुकांनासह घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे.पाऊस व रस्त्यावर पडलेल्या खड्डयामुळे महामार्गावरील वाहतूक व्यवस्था पुर्णपणे कोलमडली होती. कल्याण-डोंबिवलीमध्ये देखील पावसाने चांगलीच दमदार हजेरी लावल्यामुळे ठिकठिकाणी झाडे उन्मळून दाल्याच्या घटनांसह 3 गायीचा शॉक लागून दुर्दवी मृत्यू झाला. तर, अनेकांच्या घरात पावसाचे पाणी घुसण्याच्या घटना घडल्या.
---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rains in thane district, water logging at various places