#HopeOfLife : कोणतीही ठोस लक्षणे नसणारा अन् लहान मुलांमध्ये सर्वाधिक आढळतो 'हा' कर्करोग

File Photo
File Photo

सर्वसामान्यांसह लहान मुलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोगाचा प्रकार म्हणजे हाडाचा कर्करोग. सुरुवातीच्या टप्प्याला कोणतेही ठोस लक्षण यामध्ये आढळत नाही. सांधेदुखी, हातापायाला सूज येणे, हाडांमध्ये फ्रॅक्‍चर यांसह शरीरातील एखाद्या भागात हाडाची वाढ होते. तसेच हाडांमध्ये बीनाईन ट्युमर आणि मॅलिगनण्ट ट्युमर या दोन प्रकारच्या गाठी होतात

या गाठी शरीरातील कुठल्याही भागात निर्माण होऊ शकतात; मात्र प्रामुख्याने ती शरीरातील मोठी हाडे उदा. मांडी, पाय, हाताच्या हाडांमध्ये आढळतात. त्यामुळे त्याचे वेळेवर निदान झाल्यास कर्करोग अधिक गंभीर होण्यापूर्वी त्यावर उपचार करता येतात.

हा कर्करोग होण्याची ही आहेत कारणे
अनुवांशिकता : कर्करोगाची कौटुंबिक पार्श्‍वभूमी असलेल्यांना...
किरणोत्सार : कर्करोगावर किरणोत्सारी उपचार केल्यामुळे...
संसर्ग : फ्रॅक्‍चर झाल्यास हाडांमध्ये धातूंचा वापर केल्यास...

हाडाच्या कर्करोगाचे तीन प्रकार
ओस्टो सार्कोमा 

लहान मुलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे. या आजारात हाडांमध्ये कर्करोगाच्या गाठी तयार होतात. वेळेवर निदान न झाल्यास कर्करोगाच्या पेशी शरीरातील इतर भागांत पसरण्याची भीती असते.

कॉन्ड्रो सार्कोमा 
हा कर्करोग सामान्यतः ज्येष्ठ नागरिकांमध्ये आढळत असून तो ओटीपोट, हात आणि पायांमधील हाडांना बाधित करतो.

इविंग सार्कोमा 
यामध्ये कॉन्ड्रो सार्मोकाचीच वैशिष्ट्ये असून हा प्रामुख्याने तरुणांमध्ये आढळतो.

#HopeOfLife:

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com