#HopeOfLife: सरकार स्तनाच्या कर्करोगावर उपाययोजना करण्यास कटिबद्ध!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जानेवारी 2020

बदलती जीवनशैली, चुकीचा आहार आणि वाढत्या प्रदूषणामुळे भारतासह जगभरात कर्करोग झपाट्याने पसरत आहे. देशातील अनेक राज्यांत कर्करोगाच्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यातही स्तनाचा, गर्भाशयाचा आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.

महत्वाचे शेतकरी कर्जमाफीवर राज्यपाल कोश्यारी म्हणतात...

बदलती जीवनशैली, चुकीचा आहार आणि वाढत्या प्रदूषणामुळे भारतासह जगभरात कर्करोग झपाट्याने पसरत आहे. देशातील अनेक राज्यांत कर्करोगाच्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यातही स्तनाचा, गर्भाशयाचा आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.

महत्वाचे शेतकरी कर्जमाफीवर राज्यपाल कोश्यारी म्हणतात...

देशातील कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणाबाबत नुकतेच लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात बोलताना आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रात कर्करोगाच्या रुग्णांचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणाबाबत आणि वाढत्या रुग्णसंख्येबाबत लोकसभेत बोलताना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्‍विनीकुमार चौबे म्हणाले, की सरकारच्या वतीने स्तनाचा, गर्भाशयाचा आणि फुफ्फुसाच्या कर्करोगावर उपाययोजना करण्यासाठी विशेष लक्ष ठेवून आहे.

मह्त्वाची बातमी 'मनसे'चा मोठा चेहरा आता येणार जनतेसमोर, मनसेत आनंदी आनंद..

ईशान्येकडील राज्यांमध्ये कर्करोगाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. त्यातही केरळमध्येही कर्करोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळल्याने सरकारने चिंता व्यक्त केली. त्याशिवाय इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) सादर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कर्करोगाच्या प्रमाणाच्या तुलनेत स्तन, गर्भाशय आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णाचे प्रमाण तब्बल ४१ टक्के इतके आहे.

हे सुद्धा वाचा दहा मिनिटांचं मौन आंदोलन आणि दीपिकाचा मास्टरस्ट्रोक...

गत दोन वर्षांत कर्करोगाचे वाढलेले प्रमाण (२०१६-२०१८)

राज्य                  टक्के
केरळ                  १२.८ 
बिहार                  ११.०
जम्मू-काश्‍मीर      १०.९
छत्तीसगड           १०.७
झारखंड               १०.६
मध्य प्रदेश           १०.२
उत्तराखंड            १०.२
उत्तर प्रदेश          १०.१
गुजरात               ९.९
हरयाणा               ९.६

The rapid spread of these cancers ...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: HopeOfLife The rapid spread of these cancers ...