वस्ती घाणीच्या साम्राज्यात कोरोनाशी कसे लढायचे?

File Photo
File Photo

मुंबई : कोरोना विषाणूचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असताना मुंबई शहर स्वच्छ ठेवण्याची मोहीम सुरू झाली आहे. सर्वत्र बस गाड्या, सावर्जनिक स्थळांची स्वच्छता केली जात आहे; मात्र या मोहिमेसाठी झटणारे सफाई कर्मचारी मात्र घाणीच्या साम्राज्यात राहत आहेत. त्यामुळे या कामगार वस्तींना कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेपासून वगळले आहे का, असा प्रश्‍न निर्माण होत आहे.

चेंबूर स्थानकाशेजारी पालिकेच्या सफाई कामगारांची वस्ती आहे. वसाहतीत एकूण 18 इमारती होत्या. यातील तीन इमारती धोकादायक झाल्याने पालिकेने तोडल्या. त्यामुळे या इमारतींमधील 175 पेक्षा जास्त कामगारांना शेजारील संक्रमण शिबिरात हलवण्यात आले. येथे सफाई कामगारांना पालिकेने कुठल्याही सुविधा अद्याप पुरवलेल्या नाहीत.

या इमारतींमधील ड्रेनेज लाईन फुटली असून परिसरात घाण पाणी साचत आहे. पावसाळ्यात इमारत गळते. त्यामुळे इथल्या राहिवाशांना कुटुंबासह बाहेर झोपावे लागते. लोखंडाला गंज लागले आहे. मीटर खोलीचा दरवाजा तुटलेला आहे. त्यामुळे विशेषत: लहान मुलांना याचा धोका निर्माण झाला आहे. 

इमारतीत सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरल्याने कामगारांच्या कुटुंबांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. पाणी वेळेवर येत नाही. आलेच तरी कमी मिळते. त्यामुळे कुटुंबीयांना बाहेरून पाणी आणावे लागत आहे. 

वसाहतीत एकही कचरापेटी नाही 
चेंबूरमधील सफाई कामगारांच्या वसाहतीत एकही कचरापेटी नाही. त्यामुळे कामगार एका ठिकाणी कचरा टाकतात व तो उचलून नेतात; मात्र त्यामुळे कामगारांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. ड्रेनेज लाईन फुटल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे येथील मुलांना शाळेत जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. 

कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी आम्ही मुंबईची साफसफाई करतो; मात्र इथल्या वसाहतीतील घाण कोण साफ करणार. पालिकेने पुनर्वसन आराखडा तयार करून सफाई कामगारांना हक्काचे घर द्यावे. तोपर्यंत सफाई कामगारांना या वसाहतीत किमान मूलभूत सोईसुविधा तरी पुरवाव्यात. 
- रोहित लादे
, रहिवासी

How to fight Corona?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com