ICICI बँकेचे FD वरचे व्याजदर बदलले; हे आहेत नवीन व्याजदर

ICICI बँकेचे FD वरचे व्याजदर बदलले; हे आहेत नवीन व्याजदर

खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय ( ICICI ) बॅंकेने विविध कालावधीच्या मुदत ठेवींवरील (FD) व्याजदरात बदल केले आहेत. नवीन दर 20 नोव्हेंबरपासून लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे तुम्ही जर ICICI बँकेत नवीन FD उघडली तर खालीलप्रमाणे व्याजदर असतील.  

  1. 7 ते 14 दिवस कालावधी असलेल्या मुदत ठेवीवर 4 टक्के व्याज
  2. 15-29 दिवसांच्या मुदत ठेवीवर 4.25 टक्के व्याज
  3. 30-45 दिवसांच्या मुदत ठेवीवर 5 टक्के व्याज
  4. 46 दिवस ते सहा महिन्यांच्या मुदत ठेवीवर 5.5 टक्के व्याज 
  5. एक वर्ष ते 18 महिन्यांच्या कालावधीच्या मुदत ठेवींवरील व्याजदर आता 6.35 टक्के व्याज   

नव्या सुधारित दरानुसार, दीर्घ कालावधीच्या म्हणजेच 2 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षे कालावधी असलेल्या मुदत ठेवींवर 6.6 टक्के व्याज मिळणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांना सर्वसामान्य ग्राहकांच्या तुलनेत 0.50 टक्के अधिक व्याज मिळणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी असलेल्या मुदत ठेवींवर 4.5 टक्के ते 7.1 टक्‍क्‍यांपर्यंत व्याज मिळेल, असे बॅंकेने म्हटले आहे.

Webtitle : ICICI bank new FD rate of interest new rates will be implemented from 20th November 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com