आखाती देशांमध्ये भारतीय नोकरदार एकांतात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 मार्च 2020

रोज होते प्राथमिक तपासणी

मुंबई : भारतातून गेल्या पंधरवड्यात आखाती देशांमध्ये गेलेल्या नोकरदारांना एकांतात ठेवण्यात आले आहे. कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या नोकरदारांना त्यांच्या वसाहतीतील घरांमध्ये 14 दिवस राहण्याचा सल्ला देण्यात आला असून रोज त्यांची तपासणी केली जात आहे.

 'हा' रिपोर्ट वाचा आणि कोरोनाबद्दलची भीती मनातून काढून टाका

भारतातून अखाती देशांत जाणाऱ्या नोकरदारांची संख्या मोठी आहे. भारतात अद्याप कोरोनाचा संसर्ग मर्यादेबाहेर गेलेला नाही, पण आखाती देशांनी भारतातून येणाऱ्या नोकरदारांसाठी सक्त पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. तेल कंपन्या तसेच बांधकाम, वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिक आखाती देशांत कामाला आहेत.

वृत्तपत्रामुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही!

खास करून तेल कंपन्यांमध्ये 28 दिवस काम केल्यानंतर 28 दिवसांची सुट्टी मिळते. असे नोकरदार सुट्टी संपवल्यानंतर गेल्या आठवडाभरापासून भारतातून आखातात जाण्यास सुरुवात झाली आहे. अशा प्रत्येक प्रवाशाची तेथील विमानतळावर प्राथमिक तपासणी करून कोणतीही लक्षणे नसणाऱ्यांना एकांतवासात राहण्याचा सल्ला दिला जात आहे. हा एकांतवासाचा नियम काटेकोर पाळला जात आहे. 

कोरोनाची एसटी प्रवाशांना धास्ती

रोज अशी ठेवली जातेय निगराणी

- या नोकरदारांना त्यांच्या वसाहतीत स्वतंत्र ठेवले जाते. 
- रोज कंपनीचा प्रतिनिधी येऊन त्यांची प्राथमिक तपासणी करतो. 
-नोकरदाराचे बाहेर फिरणे किंवा इतरांशी मिसळणे, याचीही तपासणी केली जाते. 
- यात त्याची ताप, खोकला अशा लक्षणांबाबत विचारणा केली जाते. 
- रोज उष्मांक मोजला जात आहे. 
- याचा अहवाल ठराविक काळाने स्थानिक प्रशासनाला पाठवला जातो.

मुंबईला आजपासून परदेशी प्रवाशांचे आव्हान

14 दिवसांचीच सक्ती का? 
शरीरात असलेला कोरोनाचा विषाणू 14 दिवसांत वाढतो. या काळात आजाराची प्राथमिक लक्षणे दिसू लागतात. 14 दिवसांत आजाराची लक्षणे दिसली नाहीत, तर सध्या तरी कोरोनाची लागण नसल्याचे मानले जात आहे.

Indian employees are alone in the Gulf countries


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian employees are alone in the Gulf countries