Ulhasnagar: उबाठाला मोठा धक्का; डझनभर पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेच्या गळाला

अंबरनाथही पोखरले गेले असून असंख्य महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे | Ambernath has also been ousted and numerous women office bearers have joined the Shinde group
Ulhasnagar shivsena
Ulhasnagar shivsenasakal

Ulhasnagar News: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून कल्याण लोकसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांच्या दोन वेगवेगळ्या शिवसेनेत आमनासामना होणार असे चित्र आहे.

उबाठा पक्षाचे उल्हासनगरातील कॅम्प नंबर 5 मधील 15 पदाधिकारी शिंदे गटाच्या गळाला लागले आहेत.अंबरनाथही पोखरले गेले असून असंख्य महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

Ulhasnagar shivsena
Ulhasnagar Municipal Corporation : उल्हासनगर महानगरपालिकेच्या उपायुक्त पदावर किशोर गवस यांची एन्ट्री

विभागप्रमुख अनिल(लाल्या)कुंचे यांच्या सह प्रकाश भंडारी,राजु चिकणे,विकास बामणे,राजू दुधकर,सागर महाले,जावेद शेख,नरेश कबीर,यश,प्रधुमन विश्वकर्मा,रमेश हजारे,सुभाष कोळी,महिला आघाडीच्या रेखा गायकवाड,सुमित्रा प्रसाद,अरूणा प्रसाद या 15 पदाधिकाऱ्यांनी तब्बल दिडशे शिवसैनिकांना,महिलां सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा बंगल्यावर शिवसेनेत प्रवेश केला आहे.

या व्यतिरिक्त निर्भय बनोच्या सभेतून महायुतीवर सडकून टिका करणारे वक्ते किरण सोनावणे यांनीही शिंदे गटाशी घरोबा केला आहे.

Ulhasnagar shivsena
Ulhasnagar News : महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीचा पर्याय; बसपाने स्वबळावर लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले

यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे,उपनेत्या मीना कांबळे,कला शिंदे,जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे,आमदार डॉ.बालाजी किणीकर,महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी,अंबरनाथ माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी,प्रज्ञा बनसोडे,पदाधिकारी सुभाष साळुंखे,दिलीप गायकवाड,नाना बागुल,श्रीनिवास वाल्मिकी,बाळा श्रीखंडे,संदीप गायकवाड यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

या आव्हानात्मक निवडणुकीत उबाठाच्या आणखीन किती जणांना गळाला लावण्यात येते हा चर्चेचा विषय बनला आहे.

Ulhasnagar shivsena
Ulhasnagar News : उल्हासनगरने घेतला राजकीय बॅनरबाजीतून मोकळा श्वास,आचारसंहिते नंतर महानगरपालिकेचा आक्रमक पवित्रा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com