कल्याण: बल्याणी चौक ते टिटवाला रेल्वे स्थानक बस सुरु करा

रविंद्र खरात
गुरुवार, 22 जून 2017

संघटनेच्या मागणी नुसार बल्याणी मधून बस सोडता येईल का , टिटवाला रेल्वे स्थानक ते गणपती मंदिर 10 रुपये ऐवजी 5 रुपये तिकीट दर करता येईल का याबाबत अधिकारी वर्गाला सर्वे करण्याचे आदेश दिले असून त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यावर धोरणात्मक निर्णय घेतला जाईल अशी माहिती केडीएमटी महाव्यवस्थापक देवीदास टेकाळे यांनी दिली.

कल्याण - कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्दीमधील बल्याणी चौक ते टिटवाला रेल्वे स्थानक व्हाया गणपती मंदिर या मार्गावर केडीएमटी बस सेवा सुरु करा अशी मागणी परिवहन कामगार कर्मचारी संघर्ष सेना अध्यक्ष बुधाराम सरनोबत यांनी केडीएमटी प्रशासनकडे केली आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीमधील बल्याणी आणि मोहिली परिसरमध्ये दिवसेंदिवस लोकवस्ती वाढत आहे. येथील नागरिकांना टिटवाला रेल्वे स्थानक जवळ आहे. हे स्थानक गाठण्यासाठी सर्व सामान्य नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. या परिसरामध्ये सार्वजनिक बससेवा उपलब्ध नसल्याने नाईलाजास्तव येथील नागरिकाना खासगी वाहन आणि रिक्षाने प्रवास करावा लागत आहे. अव्वाचा सव्वा पैसा खर्च करावा लागत आहे. यामुळे या परिसरमध्ये बल्याणी चौक ते टिटवाला रेल्वे स्थानक व्हाया गणपती मंदिर अशी केडीएमटी बससेवा सुरु करावी, अशी मागणी परिवहन कामगार कर्मचारी संघर्ष सेना अध्यक्ष बुधाराम सरनोबत यांनी केडीएमटी प्रशासनकडे केली आहे. जर बससेवा सुरु झाली तर तेथील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

25 एप्रिल 2017 पासून टिटवाला मधील वाजपेयी चौक ते टिटवाला रेल्वे स्थानक व्हाया गणपती मंदिर केडीएमटी बस सेवा सुरु झाली असून ह्याच बससेवेचा विस्तार करून ही बस बल्याणी ते टिटवाला रेल्वे स्थानक व्हाया गणपती मंदिर असा मार्ग करावा अशी मागणी होत असून टिटवाला रेल्वे स्थानक ते गणपती मंदिर 10 रुपये ऐवजी 5 रुपये तिकीट दर करावे अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

संघटनेच्या मागणी नुसार बल्याणी मधून बस सोडता येईल का , टिटवाला रेल्वे स्थानक ते गणपती मंदिर 10 रुपये ऐवजी 5 रुपये तिकीट दर करता येईल का याबाबत अधिकारी वर्गाला सर्वे करण्याचे आदेश दिले असून त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यावर धोरणात्मक निर्णय घेतला जाईल अशी माहिती केडीएमटी महाव्यवस्थापक देवीदास टेकाळे यांनी दिली.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा ः
6 वर्षांच्या मुलीचा बलात्कार करून खून; आरोपीला गावकऱ्यांनी मारले
कल्याण: विमानतळाचा प्रश्न पेटला, शेतकऱ्यांवर पोलिसांचा गोळीबार

बीड: दोन मुलांना जिवंत जाळून पिता फरार
OLX वर गाडी पाहा, पैसे खात्यात भरा आणि ठणाणा...
'मुख्यमंत्री कानात काय म्हणाले'; जयाजी सूर्यवंशींकडूनच ऐका!
#स्पर्धापरीक्षा - महाराष्ट्राचे इलेक्‍ट्रॉनिक्‍स धोरण
चंद्रपूर: वाघाच्या हल्ल्यात एक जण ठार​
कोल्हापूर: पट्टण कोडोलीत रातोरात हटविले डिजीटल फलक, झेंडे
वारीतल कोंदणं: मनान ठरवल अन् गावाला घडवल​

Web Title: Kalyan Dombivali Municipal Transport bus service