डोंबिवली मध्ये सलग दुसऱ्या दिवशी रिक्षाविरोधात धडक कारवाई

रविंद्र खरात
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

कल्याणः कल्याण डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरमध्ये बेशिस्त रिक्षा पार्क करून रस्ते अडविणाऱ्या रिक्षा चालकाविरोधात आज (गुरुवार) सलग दुसऱ्या दिवशी कठोर कारवाई सूरु असून, यामध्ये 16 वर्ष पूर्ण झालेल्या भंगार रिक्षा रस्त्यावर धावत असल्याचे समोर आले आहे. यांच्या विरोधात आरटीओ आणि वाहतुक पोलिसांनी कारवाईचे बडगा उगारला आहे.

कल्याणः कल्याण डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरमध्ये बेशिस्त रिक्षा पार्क करून रस्ते अडविणाऱ्या रिक्षा चालकाविरोधात आज (गुरुवार) सलग दुसऱ्या दिवशी कठोर कारवाई सूरु असून, यामध्ये 16 वर्ष पूर्ण झालेल्या भंगार रिक्षा रस्त्यावर धावत असल्याचे समोर आले आहे. यांच्या विरोधात आरटीओ आणि वाहतुक पोलिसांनी कारवाईचे बडगा उगारला आहे.

16 वर्ष पूर्ण झाल्यावर रिक्षा भंगारात टाकणे कायदयाने बंधनकारक आहे. मात्र, अनेक रिक्षा चालक त्या रिक्षाची डागडुजी करून रस्त्यावर काढत असल्याने प्रवासी वर्गाचा जीव धोक्यात असल्याचे पुन्हा समोर आले आहे. मागील आठवड्यात पालिका आयुक्त पी. वेलरासु यांच्या दालनात महत्वपूर्ण बैठक झाली. यात आरटीओ अधिकारी संजय ससाणे, पोलिस उपायुक्त डॉ संजय शिंदे आणि वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त बाबाजी आव्हाड आदी सहभाग झाले होते. वाहतूक कोंडी आणि बेशिस्त रिक्षावाले याविषयावर साधक बाधक चर्चा झाली होती. त्यानुसार बुधवार ता 2 ऑगस्ट रोजी बेशिस्त रिक्षा चालकाविरोधात धड़क कारवाई सुरु करण्यात आली. यामुळे बेकायदा रिक्षा चालविणाऱ्याचे धाबे दणानले आहेत.

मिशन डोंबिवली
डोंबिवली मध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाहतुक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोविंद गंभीरे, पोलिस उपनिरीक्षक पाटील, आरटीओचे पोलिस निरीक्षक शिंदे, शिंपी, पोलिस उपनिरीक्षक देवरे आदीच्या पथकाने डोंबिवली मध्ये बेशिस्त रिक्षा चालकांचे कंबरडे मोडून काढले. दोन दिवसात 1 हजार 96 रिक्षाची तपासणी करण्यात आली, त्यात 116 रिक्षा दोषी सापडल्या तर 16 वर्ष पूर्ण झाल्याने 22 रिक्षा जप्त केल्या आहेत. यामुळे पुन्हा भंगार रिक्षाचा प्रश्न समोर आला आहे.

हे नंबर बंद झालेत
6 वर्ष पूर्ण झाले की रिक्षा स्क्रॅप करणे गरजेचे आहे मात्र काही रिक्षा चालक त्या रिक्षांची डागडुजी करत रस्तावर प्रवासी वाहतूक करतात यामुळे प्रवाश्याचे जीवाला धोका आहे.

कल्याण आरटीओ अंतर्गत शहरात येणाऱ्या ज्या रिक्षा आहेत त्यांचे नंबर mh05  ने सुरुवात होते तर पुढील नंबर हे 16 वर्ष पूर्ण झाल्याने बंद झाले आहेत.

31 जुलै  2017 पर्यंतची माहिती
B T L, M T T, MWT, MWT, MCT या सिरीज मधील रिक्षा स्क्रॅप करण्यात आल्या आहेत.

MH05 - D - 1  ते 9999 ह्या नंबरच्या रिक्षा 16 वर्ष पूर्ण झाल्याने स्क्रॅप झाली आहे.

MH 05 - K - 1001 ते 6999 स्क्रॅप झाली आहे

MH 05 -  S -   5001 ते 9999 या सिरीज मधील Mh05 - S - 6965 हे नंबर 16 वर्ष पूर्ण झाल्याने बंद करण्यात आले आहे. आरटीओ विभागाने हे नंबर बंद केले असल्याने या भंगार रिक्षाची शोध मोहिम सुरु झाली आहे.

सलग दुसऱ्या दिवशी कारवाई सुरु आहे. डोंबिवली वर आम्ही फोकस केल्याने भंगार रिक्षा ही सापडल्या आहेत. 16 वर्ष पूर्ण झालेल्या रिक्षा त्वरित स्क्रॅप करा अन्यथा कठोर कारवाई करू. डोंबिवली पाठोपाठ कल्याण पूर्व आणि पश्चिम भागात ही आरटीओ सोबत बेशिस्त रिक्षा चालकाविरोधात कारवाईचे संकेत कल्याण वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त बाबाजी आव्हाड यांनी दिले आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: kalyan news kalyan dombivali rikshaw and rto action