कल्याणमधील फेरीवाल्यांचे उद्धव ठाकरेंकडे साकडे...

रविंद्र खरात
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

कल्याणः कल्याण रेल्वे स्थानक जवळील स्कायवाक आणि परिसरात बसणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने धडक कारवाई सुरू ठेवल्याने सर्व सामान्य फेरीवाल्यांवर उपासमारीची वेळ आली असून, त्यांनी चक्क शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून न्याय देण्याची मागणी केली आहे.

कल्याणः कल्याण रेल्वे स्थानक जवळील स्कायवाक आणि परिसरात बसणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने धडक कारवाई सुरू ठेवल्याने सर्व सामान्य फेरीवाल्यांवर उपासमारीची वेळ आली असून, त्यांनी चक्क शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून न्याय देण्याची मागणी केली आहे.

कल्याण-डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर फुटपाथ आणि स्कायवाकवरील फेरीवाल्यांविरोधात कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेने कारवाई सुरू झाल्याने फेरीवाला आणि फेरीवाला संघटना नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. मात्र, या कारवाईमध्ये गरीब, निराधार, गरजू, बेरोजगार महिला, युवकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना न्याय द्या, अशी मागणी बहुजन फळ भाजी विक्रेता संघटनेने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवून केले आहे.

राष्ट्रीय फेरीवाला धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला आदेश दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व महानगरपालिकेला अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने त्या आदेशाची अंमलबजावणी न करता फेरीवाल्याविरोधात धडक कारवाईने फेरीवाल्यावर अन्याय होत असल्याची खंत संघटनेने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. जो पर्यंत फेरीवाल्यांचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत कारवाई करू नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाचे असताना बेकायदेशीर पालिका कारवाई करत असल्याचा दावा फेरीवाला संघटनेने केला आहे.

पुनर्वसन होई पर्यंत पर्यायी जागेत व्यवसाय करू द्या...
कल्याण पश्चिम मधील बोरगावकरवाडी परिसरात पट्टे मारून द्यावे किंवा एसटी डेपो लगत गुरुदेव हॉटेलकडे जाणाऱ्या फुटपाथवर व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.

महापौरांची भेट...
दरम्यान, आज (मंगळवार) फेरीवाला संघटना पदाधिकाऱ्यांनी महापौर राजेंद्र देवळेकर यांची भेट घेऊन निवेदन देत कारवाई थांबविण्याची मागणी केली आहे. फेरीवाल्यांविरोधात कारवाईला आमचा विरोध नाही. मात्र, फेरीवाल्यांचे पुर्नवसन ही करा, त्यापूर्वी त्यांना पर्यायी जागा द्या, असे आमचे मत आहे. त्यासोबत कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आश्वासनामुळे सर्व सामान्य फेरीवाल्यांनी ही शिवसेनेला मत दिले असून, आम्हाला न्याय देण्याचे साकडे फेरीवाला संघटनाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना घातले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काय आदेश देतात याकडे लक्ष्य लागले आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: kalyan news kalyan railway station street hawkers and uddhav thackeray