'केडीएमटी'च्या चालकामुळे 70 ते 80 प्रवाशांचे वाचले जीव

रविंद्र खरात
शनिवार, 22 जुलै 2017

कल्याणः कल्याण-डोंबिवली महानगर पालिका परिवहन उपक्रमाची कल्याण मोहना कॉलनी बसचा ब्रेक फेल झाला आहे हे चालक हनुमंत कदम यांच्या लक्षात येताच त्यांनी तब्बल एक ते दीड किलोमीटर पुढे चालवत वडवली परिसर मधील टेकड़ी आणि भिंत जवळ दगडात बस घातल्याने पुढील दुर्घटना टळली. तब्बल 70 ते 80 प्रवासी वर्गाचा जीव वाचविला.

याबाबत मिळालेल्या माहिती नुसार, कल्याण मोहना कॉलनी केडीएमटी बस (एम एच 05 - आर - 449) ही कल्याण वरुन साडे पाच वाजता निघाली होती. बस मध्ये 70 ते 80 प्रवासी होते. कल्याण वरुन शहाड पुल मागे गेल्यानंतर मोहनाच्या दिशेने बस निघाली होती. उल्हास नदीचा पुल अगोदर ब्रेक निकामी झाल्याचे चालक हनुमंत कदम यांच्या लक्षात आले. त्यांनी प्रवाश्याना सूचना देत शांत राहण्याचे आवाहन केले.

एकीकड़े उल्हासनदी आणि दूसरीकडे रेल्वे फाटक बंद होते. बस सरळ ठेवली, बस सुरु ठेवत आजू-बाजूच्या वाहन चालकाना आवाज करत  आरडा ओरड करत इशारा देत होते. फाटककड़े बस वळविण्याऐवजी डावीकडे बस घातल्यावर कच्चा रस्ता असल्याने बसचा वेग कमी झाला. तेथील दगडाच्या कठड़याला धड़क दिल्याने पुढील अनर्थ टळला. यामध्ये बस चालक हनुमंत कदम हे किरकोळ जखमी झाले आहेत.

दरम्यान, 70 ते 80 प्रवाशांचा जीव वाचला... काळ आला होता पण वेळ आली नव्हती, अशी प्रतिक्रिया प्रवासी वर्ग व्यक्त करत होते. घटना घडल्यानंतर केडीएमटी प्रशासनने पर्यायी बस पाठवून प्रवासी वर्गाला पुढे पाठविण्यात आले. या घटनेमुळे केडीएमटीच्या ब्रेक डाउन, नादुरुस्त बस प्रकरण पुढे आले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत परिवहन समिती सभापती संजय पावशे यांनी चौकशीचे आदेश दिले असून, दोषी वर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:

Web Title: kalyan news kdmt bus break fail