

Pranit More Show Controversy
ESakal
मुंबई : केईएम रुग्णालयातील एका विद्यार्थ्यानिच्या मृतदेहांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी दोन वरिष्ठ डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली असून अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. हरीश पाठक यांनी दिली.