केईएम रॅगिंग प्रकरण : आरोपी विद्यार्थ्यांच्या आणि वरिष्ठांच्या विरोधात अट्रोसिटी

केईएम रुग्णालय रॅगिंग प्रकरणात आरोपी विद्यार्थ्यांविरोधात अट्रोसिटी गुन्हा दाखल करण्यात आला.
crime
crimesakal
Summary

केईएम रुग्णालय रॅगिंग प्रकरणात आरोपी विद्यार्थ्यांविरोधात अट्रोसिटी गुन्हा दाखल करण्यात आला.

मुंबई - केईएम रुग्णालय रॅगिंग प्रकरणात (KEM Hospital Ragging Case) आरोपी विद्यार्थ्यांविरोधात (Student) अट्रोसिटी (Atrocity) गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला. वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या दलित विद्यार्थ्यांला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

पीडित विद्यार्थ्याला केईएम रुग्णालयातील आरोपी विद्यार्थ्यांकडून रॅगिंग करीत जातीवाचक शिवीगाळ करणे, अपशब्द वापरले जात होते. झाडू मारायला, भांडी घासायला लावणे, मृतदेह नेणाऱ्या स्ट्रेचर वर झोपवणे आदि प्रकारचा त्याला त्रास देत होते. त्यासंदर्भात पीडित विद्यार्थ्याने वॉर्डन सुनील कायुरे, समाधान किटकरी आणि समाधान सोनवलकर यांना दिली. त्यावर कारवाई करायचे सोडून उलट वार्डन डॉ. सुनील कुयरे यांनी त्याला व त्याच्या पालकांना महाविद्यालयामधून काढून टाकण्याची धमकी दिली. पण त्यांनी ही आरोपी विद्यार्थ्यांची बाजू घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शेवटी पीडित विद्यार्थी घाबरून हिंगोली येथे आपल्या गावी गेला होता. काही दिवसांनी परत आल्यानंतर ही त्रास सुरू झाल्याने पीडित विद्यार्थ्याने घडल्या सर्व प्रकारची माहिती महाविद्यालयाचे अधिष्ठाता, उपअधीक्षक, विभागप्रमुख यांना ही दिली. मात्र त्यांनी ही त्यावर काहीही कारवाई केली नाही.

crime
किरण मानेंची मालिकेतून एक्झिट का? दिग्दर्शकाने सोडलं मौन

पीडित विद्यार्थ्याला मागील तीन वर्षांपासून त्रास दिला जात होता. अनेकदा तक्रारी करून देखील त्रास आणि जातीवाचक शिवीगाळ सुरूच होती. यामध्ये पीडित विद्यार्थ्यांच्या रूप पार्टनर सह इतर 13 विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यानंतर पीडित विद्यार्थ्याने त्याला होणाऱ्या त्रास तसेच छळवणुकीची माहिती महाविद्यालयाचे वॉर्डन सुनील कायुरे, समाधान किटकरी आणि समाधान सोनवळकर यांना दिली. पण त्यांनी ही आरोपी विद्यार्थ्यांची बाजू घेतली. तसेच 2019 व 2021 मध्ये झालेल्या प्रकाराबाबत पीडित विद्यार्थ्याने महाविद्यालयाचे अधिष्ठाता व अकॅडमीक अधिष्ठाता यांच्याकडे देखील तक्रार केली मात्र त्यांनी ही चौकशी समिती गठीत न करता या प्रकाराची दखल घेतली नाही. एका महिन्याभरापूर्वी घडलेल्या घटनेबाबत कारवाई न केल्यामुळे कॉ. सुबोध मोरे आणि इतर कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केल्याने विद्यार्थ्यांसह 16 जणांवर भोईवाडा पोलिस स्टेशन मध्ये अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्या अन्वये गुन्हा दाखल केला.

पोलीस या प्रकरणात वेळकाढूपणा करत आहेत. त्यांनी ताबडतोब दोषीं आरोपींवर कारवाई करायला हवी. तत्कालीन अधिष्ठाता व अकडेमीक अधिष्ठाता यांना देखील पोलिसांनी सह आरोपी करायला हवे. पोलिसांनी दोन दिवसात कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन छेडलं जाईल.

- कॉ. सुबोध मोरे , सामाजिक कार्यकर्ते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com