

मुंबई : ड्रग्ज माफिया ललित पाटील याची अटक आणि पोलीस कोठडीनंतर मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेत याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी या प्रकरणात काही राजकीय कनेक्शन आहे का? या प्रश्नावर मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरणही दिलं. (Lalit Patil Drugs Case Is there political connection Mumbai Police gave an explanation)
मुंबई पोलीस सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ऑगस्ट महिन्यापासून मुंबई पोलिसांनी ही कारवाई सुरु केल्याचं सांगितलं. यामध्ये आत्तापर्यंत १४ आरोपींना अटक झाली होती त्यात आज ललित पाटील या १५ व्या आरोपीला अटक केली. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी 'ड्रगमुक्त महाराष्ट्र' मोहिमेंतर्गत ही कारवाई झाली.
यामध्ये १० ग्रॅम ड्रग्ज पकडण्यापासून सुरु झालेल्या कारवाईत आत्तापर्यंत १५० किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. ज्याची किंमत ३०० कोटी रुपये आहे. यामध्ये मुंबईतील डोंगरी, पुणे, आंध्र प्रदेश आणि नाशिक इथल्या कारखान्यातील छाप्यात मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज जप्त करण्यात आलं. (Latest Marathi News)
मुंबई पोलिसांनी या ड्रग्ज प्रकरणात आत्तापर्यंत केलेल्या तपासात काही राजकीय कनेक्शन मिळालं आहे का? असा प्रश्न पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. यावर उत्तर देताना "आमच्या तपासात अद्याप असं काहीही निष्पन्न झालेलं नाही" असं सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.