

पुणे : ड्रग्ज माफीया ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी चेन्नईमधून ताब्यात घेतलं आहे. या मोठ्या कारवाईवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यामधून अनेकांचे लागेबांधे समोर आले आहेत. आता अनेकांची तोंड बंद होतील, असं त्यांनी म्हटलं आहे. (Lalit Patil Drugs Case nexus come to light now mouths will be shut Devendra Fadnavis reaction)
फडणवीस म्हणाले, 'ड्रग्स फ्री महाराष्ट्र' संकल्पनेवर आधारीत जी परिषद झाली तेव्हा याचा बिमोड करण्यास सगळ्यांना सांगण्यात आलं होतं, त्यानुसार सगळे युनिट्स कामाला लागले आहेत. मुंबई पोलिसांना देखील नाशिकची माहिती मिळाली आणि त्यांनी धाड टाकली.
ललित पाटील आता हाती आला आहे, यानंतर मोठं जाळं बाहेर येईल. एक मोठा नेक्सस आता समोर आला आहे. आता सगळं गोष्टी बाहेर येतील आणि अनेकांची तोंड बंद होणार आहेत. याप्रकरणी सगळी चौकशी केली जाणार असून कोणालाही सोडलं जाणार नाही, अशा शब्दांत फडणवीसांनी इशारा दिला आहे.
दरम्यान, ललित पाटील याला मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी बंगळुरु आणि चेन्नई दरम्यानच्या एका ठिकाणावरुन काल रात्री उशीरा ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याला मुंबईत आणण्यात आलं. सकाळी कोर्टात हजर करण्यापूर्वी त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. याठिकाणी मीडियाच्या कॅमेरॅसमोर त्यानं आपण ससून मधून पळून गेलो नव्हतो तर आपल्याला पळवलं गेलं होतं असा खळबळजनक आरोप केला. त्यामुळं आता यामागे काही राजकीय कनेक्शन आहेत का? याची चर्चा सुरु झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.