Mahanagar Gas Cuts CNG Price in Mumbai: दिलासादायक बातमी! मुंबईत सीएनजी गॅसच्या दरात कपात; मध्यरात्रीपासून नवे दर लागू

Mahanagar Gas Cuts CNG Price in Mumbai: मुंबईतील वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी आहे. महानगर गॅस लिमिटेडने मुंबईत सीएनजीच्या दरात कपात केली आहे.
Mahanagar Gas Cuts CNG Price in Mumbai
Mahanagar Gas Cuts CNG Price in MumbaiEsakal

मुंबईतील वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी आहे. महानगर गॅस लिमिटेडने मुंबईत सीएनजीच्या दरात कपात केली आहे. मंगळवारी (५ मार्च) मध्यरात्रीपासून सीएनजीचे दर कमी करण्यात आले आहेत. महानगर गॅस लिमिटेडनं प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

वाहनांमधील नैसर्गिक वायूचे प्रमाण वाढावे सीएनजीचे दर कमी करण्यात आल्याचा कंपनीनं सांगितलं आहे. महानगर गॅस लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत सीएनजीच्या दरात (CNG Price) प्रतिकिलो २.५० रुपयांची कपात करण्यात आलेली आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता एक किलो सीएनजीसाठी केवळ ७३.४० रुपयात मिळणार आहे.

मुंबईत मोठ्या प्रमाणावर सीएनजीवर चालणारी वाहने आहेत. दर कपातीमुळे या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Mahanagar Gas Cuts CNG Price in Mumbai
जात प्रमाणपत्र पडताळणी करायचीयं का? जात प्रमाणपत्र असले तरी मिळेल वैधता प्रमाणपत्र; प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे ११ मार्चपर्यंत त्रुटी पूर्तता शिबिर

पीएनजीचे दर जैसे थे

दरम्यान, पीएनजीच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याआधी ऑक्टोबर महिन्यात महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी-पीएनजीच्या दरात कपात केली होती. त्यावेळी सीएनजीचे दर ३ रुपये तर पीएनजीचे दर २ रुपयांनी कमी करण्यात आले होते.

दरम्यान, उत्पादन खर्चात कपात झाल्यामुळे येत्या काही दिवसांत देशाच्या इतर भागात सीएनजीच्या दरात कपात होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुका यामुळे केंद्र सरकार इंधनाच्या किंमतीत कपात करण्याचा निर्णय घेऊ शकतं.

Mahanagar Gas Cuts CNG Price in Mumbai
जात प्रमाणपत्र पडताळणी करायचीयं का? जात प्रमाणपत्र असले तरी मिळेल वैधता प्रमाणपत्र; प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे ११ मार्चपर्यंत त्रुटी पूर्तता शिबिर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com