राज्याच्या कोरोना विशेष टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनाही कोरोनाची बाधा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 1 July 2020

कोरोनाबाबतच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील नामवंत आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेमलेल्या टास्क फोर्सचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. संजय ओक यांनाही आता कोरोनाची लागण झाली आहे.

मुंबई : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि कोरोनाच्या रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार करणाऱ्या डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि एकूणच कोरोना उपचाराचे नियोजन करण्यासाठी राज्य सरकारने एप्रिल महिन्यात विशेष टास्क फोर्सची स्थापना केली. या टास्क फोर्सकडून राज्यातील संपूर्ण करोना परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत होते. अशा या टास्क फोर्सच्या प्रमुखपदी डॉ. संजय ओक यांची नियुक्ती करण्यात आली होती.

मुंबईकरांनो सावधान! जुलै महिन्यातील आठ दिवस धोक्याचे; प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा..

कोरोनाविरूद्धचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी टास्क फोर्सकडून विविध उपाययोजना राबवल्या आखल्या जातात. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचे आदेशही टास्क फोर्सकडून दिले जाते. कोरोनाबाबतच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील नामवंत आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेमलेल्या टास्क फोर्सचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. संजय ओक यांनाही आता कोरोनाची लागण झाली आहे.

सावधान! कोरोनाचे संकट होणार गडद; डिसेंबरपर्यंत देशातील 'इतके' कोटी लोकसंख्या होणार कोरोनाबाधित... 

डॉ. संजय ओक यांच्यावर फोर्टिस रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून, त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. राज्याच्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोनाच्या वाढीची कारणे आणि रूग्णांचा मृत्यू या मागची कारणे शोधणे आणि डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यासाठी स्थापन केलेल्या टास्क फोर्सची जबाबदारी ही डॉ. ओक यांच्याकडे होती. मात्र, आता ते स्वतः कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

ठाणेकरांनो! उद्यापासून असा असेल 'लॉकडाऊन', प्रशासनाकडून 'नियमावली' जाहीर

गेल्या 20 दिवसांपासून ते आजारी आहेत. याआधी त्यांना प्रिन्स अली खान या रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, आज त्यांना फोर्टिस रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉ. ओक यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना बुधवारी तातडीने फोर्टीस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉ. ओक यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना ऑक्सिजन देण्यात आला असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

खाकी वर्दीची तत्परता ! एक ट्विट अन् 'त्या' व्यक्तीच्या मदतीसाठी पोलिस धावून गेले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर राज्याचे मुख्य सचिव, पालिका आयुक्त यांच्या कोरोनासंदर्भात होणार्‍या बैठकांमध्ये डॉ. संजय ओक हे टास्क फोर्सचे प्रमुख असल्याने सहभागी होत असे. ओक यांचा अनेक महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क आला आहे.

कोरोनावरील उपचारासाठी तब्बल १३ लाखांचे बिल; मनसेकडे धाव घेताच...!

आरोग्य संचालकांच्या शिपाईलाही कोरोना  
राज्याच्या आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. साधना तायडे यांच्या कार्यालयातील शिपायालाही कोरोना झाला आहे. या शिपायाला ताप येत असल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली असता त्याचा रविवारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. हा शिपाई शनिवारपर्यंत कामावर येत होता. तसेच तो अनेक अधिकारी उपस्थित कर्मचार्‍यांच्या संपर्कात आल्याने आरोग्य विभागामध्ये खळबळ उडाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra corona special task force chief dr. sanjay oak gets corona positive