राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात..

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

आज मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांना आजच्या मंत्रिमंडळ बैठकीबद्दल माहिती दिली. मंत्रिमंडळातील बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर.  यामध्ये मुंबईमध्ये उभारण्यात येणारं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक, स्मार्ट कृषी याचसोबत सादर केलं जाणारं आर्थिक बजेट आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकारचं बजेट या सर्व गोष्टीबद्दल माध्यमांना माहिती दिली.   

आज मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांना आजच्या मंत्रिमंडळ बैठकीबद्दल माहिती दिली. मंत्रिमंडळातील बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर.  यामध्ये मुंबईमध्ये उभारण्यात येणारं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक, स्मार्ट कृषी याचसोबत सादर केलं जाणारं आर्थिक बजेट आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकारचं बजेट या सर्व गोष्टीबद्दल माध्यमांना माहिती दिली.   

 • डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी 1189 लाख रुपयांची मान्यता देण्यात आली आहे.
 • या स्मारकासाठी वास्तू विशारद म्हणून शशी प्रभू यांनी निवड करण्यात आली आहे 
 • मंत्रिमंडळात आज याबाबत प्रेझेन्टेशन दाखवण्यात आलं 
 • राज्य सरकारच्या सर्व विभागांच्या परवानग्या या-त्या सचिवांनी 8 दिवसात द्याव्यात अशी विनंती करण्यात आली आहे

मोठी बातमी - जाऊदे यावर्षी भाड्याच्या घरात राहू, पुढच्या वर्षी पाहू..

 • महाराष्ट्र शासन आणि एमएमआरडीए हा प्रकल्प करणार आहे, यामध्ये राज्य शासन काही कमी पडू देणार नाही
 • याठिकाणी चवदार तळ्याची प्रतिकृती, सभागृह, संशोधन सोय, व्याखानवर्ग, वाचनालय, ग्रंथालय आदी गोष्टी असणार आहेत.  
 • या कामाला आता कामाला खऱ्या अर्थाने गती मिळालीये. आता हे काम न अडकता पूर्ण होईल 
 • स्मारकाच्या ठिकाणची झाडं जशी च्या तशी राखण्यासाठी आम्ही प्रयन्त करणार आहोत. 
 • 21 तारखेला 4 वाजता शरद पवार इंदू मिलला भेट देणार आहेत  
 • आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य मंत्रिमंडळाने स्मार्ट कृषीला मान्यता दिली आहे .

मोठी बातमी - मंगेशकर कुटुंबाची फडणवीसांवर नाराजी, पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणाले..
 

 • विरोधकांच्या कामावर बोलताना 'झालं गेलं गंगेला मिळालं म्हणत, त्यांनी काय केलं काय नाही यावर बोलायचं नाही' असं अजित पवार म्हणालेत 
 • विरोधकांच्या टीकेकडे न लक्ष देता आता महाविकास आघाडीचं सरकार कशा पद्धतीने गतीने काम करेल याकडे सध्या लक्ष आहे असं देखील उपमुख्यमंत्री म्हणालेत 
 • आम्ही अर्थसंकल्पावर देखील काम सुरू केले आहे
 • 1 तारखेला केंद्राचा अर्थसंकल्प आहे. देशात बेरोजगारी आणि मंदीचं  संकट आहे याचा केंद्राने पण विचार केला पाहिजे

मोठी बातमी - ३३ वर्षानंतर मिळाली आईची चेन, फक्त आज आई असायला हवी होती.

 • राज्यातील तरुणांना रोजगार कसा मिळवता येईल याकडे  सरकारने लक्ष देत, या विचाराने अर्थसंकल्प केंद्राने सादर करायला हवा
 • बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासंदर्भात केंद्राच्या कोणत्याही परवानग्या बाकी नाहीत 
 • मुंबईतील इस्टर्न फ्री-वे ला स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे नाव देण्याचं ठरतंय. कारण या कामात विलासराव देशमुख यांचा मोठा मोठा पुढाकार होता
 • स्मार्ट कृषीला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचं ठरतंय 

Photo - उदयन राजेंच्या टीकेला राष्ट्रवादीचं थेट उत्तर, मुंबईत लागले पोस्टर्स..

 • मुंबईत आणि महाराष्ट्रात काही नवीन गोष्टी तयार व्हायला हव्यात. लंडन आणि सिंगापूरच्या धर्तीवर मुंबईत लंडन आय बनवण्यावर चर्चा झाली आणि त्यांवर सर्वांनी होकार दिलाय 

Maharashtra DCM Ajit pawar on todays cabinet meeting 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra DCM Ajit pawar on todays cabinet meeting