esakal | ऑक्सिजन वाहतुकीला राज्यभर मिळणार पोलीस संरक्षण

बोलून बातमी शोधा

Oxygen-Supply

ऑक्सिजन वाहतुकीला राज्यभर मिळणार पोलीस संरक्षण

sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: राज्यात सध्या कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे उपाचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय ऑक्सिजनची मागणीही मोठी आहे. अशा परिस्थितीत वैद्यकीय ऑक्सिजनची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक केली जाते. या ऑक्सिजन वाहतुकीला आता राज्यभर पोलीसांचे संरक्षण देण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वी वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा करणारा टँकर धुळ्यातील हॉस्पिटलच्या दिशेने जात होता. तो दुसरीकडे वळवण्यात आल्याची घटना घडली. या घटनेतून बोध घेऊन आता प्रत्येक ऑक्सिजन टँकरला पोलीस संरक्षण दिलं जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्यांना पोलिसी खाक्या दाखवण्यास सुरूवात झाली असून गेल्या पाच दिवसात राज्यभरात १८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा: कारागृहात असणाऱ्या इंद्राणी मुखर्जीला कोरोनाची लागण

"धुळ्यात घडलेल्या प्रकाराबद्दल आम्हाला एका अज्ञात व्यक्तीकडून माहिती मिळाली. या प्रकरणात कितपत तथ्य आहे याची आम्ही चाचपणी करतो आहोत. वैद्यकीय ऑक्सिजनची कमतरता असल्याने लोक काहीशी गोंधळलेली आणि भांबावलेली आहेत. त्यामुळे सध्याच्या काळात ऑक्सिजनच्या वाहतुकीची सुरक्षितता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणूनच गेल्या दोन दिवसांपासून वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा करणारे सिलिंडर्स किंवा गॅस टँकर्स यांना संपूर्णपणे पोलीस संरक्षण दिलं जात आहे", असं राज्याचे कार्यकारी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा: ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर महाराष्ट्राला कमी पाडला जातोय? - संजय राऊत

"पोलिसांना दिलेल्या आदेशानुसार ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांचे सुरूवातीचे ठिकाण आणि ऑक्सिजन पोहोचवण्याचे ठिकाण अशा दोन्ही ठिकाणांची माहिती पोलीस अधिकारी घेत आहेत. त्या मिळालेल्या माहितीनुसार त्या-त्या जिल्ह्याच्या पोलिसांना माहिती पुरवली जाते आणि मग ऑक्सिजन टँकर्सना पोलिस संरक्षण दिलं जातं", अशी प्रक्रिया त्यांनी समजावून सांगितली.

हेही वाचा: लॉकडाउन शेवटचा पर्याय? संजय राऊत म्हणतात...

एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सध्या ऑक्सिजनच्या वाढत्या मागणीमुळे विविध राज्यात प्रचंड कोलाहल माजला आहे. मंगळवारच्या दिवशी काही कारणास्तव मध्य प्रदेशातील एका रूग्णालयाने रूग्णाला हॉस्पिटलमध्ये भरती करून घेण्यास नकार दिला. त्यानंतर काही लोकांनी हॉस्पिटलच्या स्टोअर रूमवर हल्ला चढवला आणि ऑक्सिजन सिलिंडर्स चोरून नेले. अशा गोष्टी राज्यात होऊ नयेत म्हणून उपाययोजना करण्यात येत आहेत.

हेही वाचा: नाशिकमध्ये घडला तो अपघात पण मुंबईत... - किशोरी पेडणेकर?

रेमडेसिवीरचा तुटवडा ही देखील गंभीर समस्या आहे. १६ एप्रिलपासून राज्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार होण्याच्या १८ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहे. त्या १८ प्रकरणांअतर्गत एकूण ३२ लोकांचा समावेश आहे. रेमडेसिवीरच्या काळाबाजाराची पुण्यात ४, नागपूर ३, मिरा-भायंदर २ आणि औरंगाबाद, नंदुरबार, नांदेड, भंडारा, लातूर, पुणे ग्रामीण, कोल्हापूर, परभणी आणि अहमदनगर या ठिकाणांतून प्रत्येकी १-१ प्रकरणं उघड झाली आहेत.