Mumbai Crime: प्रेयसीसोबतच्या न्यूड व्हिडिओवरून विद्यार्थ्याला ब्लॅकमेल करणाऱ्याला अटक

पैसे न दिल्यास आता व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकीही त्यांनी दिल्याचे समोर आले आहे
crime news
crime newssakal

अंधेरी येथील एका विद्यार्थ्याला ब्लॅकमेल करणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सोमवारी अटक केली आहे. अरबाज उकानी (वय वर्षे २७) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून तो तक्रारदाराचा मित्र आहे.

हेही वाचा : Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

बीकॉमच्या विद्यार्थ्याला त्याचा आणि त्याच्या मैत्रिणीचा एक व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमक्या देऊन पैशांची मागणी केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अंधेरीच्या एकाला अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव अरबाज हनिफ उकानी असे आहे. पोलिस त्याचा साथीदार झायेदचा शोध घेत आहेत.

crime news
Shraddha Murder Case: 'मेरा अबदुल ऐसा नही' केतकी चितळेची दिल्ली मर्डर प्रकरणावरील पोस्ट चर्चेत

पोलिस आधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार उकानी आणि झायेद 20 वर्षीय बीकॉमच्या विद्यार्थ्याला एका कॉमन फ्रेंडद्वारे भेटले. त्यानंतर तिघे वारंवार भेटू लागले आणि जवळचे मित्र बनले. सुमारे सहा महिन्यांपूर्वी, तक्रारदाराच्या एका मित्राने त्याला सांगितले की उकानी आणि झायेद त्याला ड्रग्ज प्रकरणात अटक करणार आहेत. त्यानंतर तक्रारदाराने त्यांच्यापासून दूर राहण्यास सुरुवात केली आणि मैत्री संपवली. याचा राग मनात धरत उकानी आणि झायेद यांनी बीकॉमच्या विद्यार्थ्याला फोन केला. फोनवरून त्यांनी सांगितले की, त्याच्याकडे त्याच्या मैत्रिणीसोबतचा एक व्हिडिओ आहे.

crime news
Shraddha Murder Case: भरचौकात फाशी द्या; संजय राऊतांची मागणी

त्यानंतर उकानीने बीकॉमच्या विद्यार्थ्याची भेट घेतली आणि त्याला तो व्हिडिओ दाखवला, ज्यामध्ये तो त्याच्या मैत्रिणीसोबत कपड्यांशिवाय दिसत होता. तक्रारदाराला हे पाहून धक्का बसला त्याने उकानीला व्हिडिओ कसा मिळवला हे विचारले परंतु त्याने काहीच सांगितले नाही याबाबतची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

crime news
Shraddha Murder Case: लव्ह जिहादवरून राम कदम आक्रमक! श्रद्धाला न्याय मिळवून देण्यासाठी...

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ​​उकानीने त्या बीकॉमच्या विद्यार्थ्याकडे 5 लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास आता व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकीही त्यांनी दिल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, उकानी आणि झायेद विद्यार्थ्याला धमकीचे फोन करत होते. पोलिसांकडे गेल्यास जीवे मारण्याची धमकीही दोघांनी दिली होती. दरम्यान सर्व प्रकार पोलिसांना समजताच आरोपींना अटक केली असून त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना 16 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com