मुंबईत कार चालकाची ट्रॅफिक पोलिसाला धडक, प्रकृती गंभीर...

मुंबईत कार चालकाची ट्रॅफिक पोलिसाला धडक, प्रकृती गंभीर...

मुंबई- ऑन ड्युटी असलेल्या ट्रॅफिक पोलिसाला एका कार चालकानं जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. व्हीआयपी वाहतूकीसाठी 40 वर्षीय ट्रॅफिक पोलिस महालक्ष्मी मंदिराजवळच्या कॅडबरी जंक्शन येथे सेवा बजावत होते. याच दरम्यान एका कार चालकानं त्यानं जोरदार धडक दिली. यात अपघातात ते गंभीर जखमी झालेत. गावदेवी पोलिसांनी कार चालकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला कार चालक पेडर रोड येथील सर्व्हट क्वार्टर येथे त्याच्या मालकाच्या घरी राहतो.  

संध्याकाळी 6.15 च्या सुमारास ताडदेव वाहतूक विभागातील ट्रॅफिक पोलिस हवालदार अजितराव म्हस्के हे त्यांच्या सहकाऱ्यांना मदत करण्यासाठी रस्त्यावरुन जात असताना त्यांना होंडा जॅझ या गाडीनं धडक दिली. धडक बसल्यानं ते रस्त्यावर पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती, वाहतूक पोलिस विभागातील सूत्रांनी दिली. 

आम्ही सर्वजण व्हीआयपी वाहतुकीसाठी वाहतूक नियंत्रित करण्यात व्यस्त होतो. भुलाभाई देसाई रोड येथून एक कार आली आणि म्हस्के यांना धडक दिली. कारने म्हस्के यांना धडक दिल्यानंतर ते खाली पडले आणि त्यांचे डोकं रस्त्यावर जोरात आपटलं. त्यांच्या डोक्यातून लगेचच रक्तस्राव होऊ लागला. त्याच्या डाव्या हाताला आणि खांद्याला गंभीर दुखापत झाली, अशी माहिती एका ट्रॅफिक पोलिसानं दिली. 

म्हस्के यांना धडक बसल्याचं समजताच आमच्यातील काही जण लगेचच तिथे आले. त्यांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जटाशंकर बाळू यादव (वय 35) हा त्यांचा मालक अंकितशेठ याच्यासोबत प्रवास करीत होता. त्यांनी तात्काळ मदत करत म्हस्के यांनी रुग्णालयात नेलं, अशी माहिती सुत्रांनी दिली.

ताडदेव वाहतूक पोलिस स्टेशनचे निरीक्षक बाळासाहेब चव्हाण म्हणाले, म्हस्के यांच्या डोक्याला चार टाके पडले असून या अपघातात डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. म्हस्के अद्याप रुग्णालयात असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी यादव याच्याविरूद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलम आणि मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरु आहे.

man hits on duty traffic police in mumbai police seriously injured in accident

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com